श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा; लाखो भाविकांसाठी हायटेक टेंट सिटीसह अनेक सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 02:23 PM2023-08-22T14:23:10+5:302023-08-22T14:24:29+5:30
Ayodhya Ram Mandir News: या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे.
अयोध्या: देशातील करोडो रामभक्त ज्या क्षणाची वाट पाहत आहेत, तो क्षण त्यांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे. अयोध्येतील भव्य-दिव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. सोहळ्याला ऐतिहासिक बनवण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.
श्री रामजन्मभूमि मंदिर के प्रथम तल पर द्रुत गति से चल रहे निर्माण कार्य की एक झलक
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 6, 2023
Glimpses of construction work going on at Shri Ramjanmabhoomi Mandir in Ayodhya ji. pic.twitter.com/mn24R83yHC
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातील संत, धर्माचार्य आणि पाहुण्यांना मोठ्या संख्येने आमंत्रित केले जाणार आहे. एकीकडे मठ, मंदिरांमध्ये संत आणि धर्मगुरुंच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे, तर दुसरीकडे इतर पाहुण्यांच्या निवासासाठी प्रयागराजमधील कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत हायटेक सुविधांनी सुसज्ज टेंट सिटी उभारण्याची तयारी सुरू आहे.
राम मंदिराची किती तयारी झाली?
अयोध्येतील राममंदिराचा तळमजला आणि गर्भगृह तयार झाले आहे. 20 ते 25 जानेवारी, या कालावधीत धार्मिक विधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील धर्मगुरुंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. रामललाचा अभिषेक सोहळा सुमारे नऊ दिवस चालेल, ज्यामध्ये धर्माचार्य धर्मग्रंथानुसार धार्मिक विधी पार पाडतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका शुभ मुहूर्तावर रामललाला गर्भगृहात विराजमान करतील. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखो लोक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.