Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी

LIVE

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 07:12 AM2024-01-22T07:12:39+5:302024-01-22T15:23:15+5:30

Live Coverage of the Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : संपूर्ण देशाचे ...

ayodhya ram mandir pran pratishtha ram lalla narendra modi Inauguration live updates in marathi | Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी

Live Coverage of the Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : संपूर्ण देशाचे स्वप्न आज पूर्ण झाले. अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होता,  तो क्षण आज याचि देही, याचि डोळा देशाने अनुभवला. अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान झाले. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह उद्योगपती, कलाकार, खेळाडूंसह देशभरातील अनेक नागरिक अयोध्येत उपस्थित होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. या सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. 

LIVE

Get Latest Updates

04:21 PM

निमंत्रित दिग्गजांना नमस्कार करुन निघाले मोदी

देशभरातून प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या ७ हजार दिग्गजांना मोदींनी भेटून नमस्कार केला. ज्यांच्या भेटीसाठी दररोज रांगा लागतात, ते दिग्गजही येथे रांगेत पाहायला मिळाले. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, संत, महाराज आणि राजकीय नेतेही दिसून आले. बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, उद्योगपती मुकेश अंबानी हेही सपत्निक दिसून आले. तर, श्री श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव यांच्यासह अनेक मोठमोठे संत, साधूही येथे दिसून आले. मोदींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. यावेळी, अमिताभ बच्चन यांनाही हात जोडून नमस्कार केला. 

03:19 PM

राम ही भारताची श्रद्धा आहे - नरेंद्र मोदी

राम मंदिर हे फक्त मंदिर नाही तर ते भारताची ओळख आहे. राम ही भारताची श्रद्धा आहे. राम ही भारताची कल्पना आहे. राम म्हणजे भारताची चेतना, विचार, प्रकाश, प्रभाव, राम सर्वव्यापी, जग, वैश्विक आत्मा आहे. तसेच, रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. हे बांधकाम आगीला जन्म देत नसून ऊर्जेला जन्म देत असल्याचे आपण पाहत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

02:53 PM

राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "प्रत्येक युगात लोक राम जगले आहेत. प्रत्येक युगात लोकांनी आपापल्या परीने राम त्यांच्या शब्दात व्यक्त केला आहे. हा रामरस जीवनाच्या प्रवाहासारखा अखंड वाहतो. राम आग नसून ऊर्जा आहे. वाद नाही, समाधान आहे."

02:42 PM

प्रदीर्घ वियोगानंतर आलेले संकट संपले - नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत. आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. मला विश्वास आहे की प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील. आज आमचे राम आले आहेत. आज आपल्याला श्री रामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभे राहिले आहे. ही वेळ सामान्य नाही. प्रदीर्घ वियोगामुळे आलेले संकट आता संपले आहे. राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली."

02:38 PM

बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम परतलेत - नरेंद्र मोदी

अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर आज आपले राम आले आहेत. बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम परतले आहेत.आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
 

02:35 PM

आमचे राम आले आहेत - नरेंद्र मोदी 

अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले की, आज आमचे राम आले आहेत. २२जानेवारी ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही. हे नवीन कालचक्राचे मूळ आहे.

02:30 PM

प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत - नरेंद्र मोदी

प्रभू श्रीराम आता तंबूत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील. या गोष्टीचा आनंद संपूर्ण देशातील राम भक्तांना आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
 

02:27 PM

संपूर्ण देश राममय झाला - योगी आदित्यनाथ

रामलला प्राणप्रतिष्ठा झाल्याने संपूर्ण देश राममय झाला आहे. त्यामुळे असे दिसून येते की, आपण त्रेतायुगातच प्रवेश करत आहोत. आम्ही राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता आणि त्याठिकाणी राम मंदिर बांधले आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

02:24 PM

साध्वी ऋतंभरा, उमा भारती भावूक

साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली. त्यावेळी दोघीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकींची गळाभेट घेतली.  
 

02:08 PM

मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवून व्यक्त केला आनंद

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. 

01:55 PM

पंतप्रधान नतमस्तक

प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर भगवान राम यांच्यासमोर ते नतमस्तक झाले. तसेच, नरेंद्र मोदी यांनी पूजा झाल्यानंतर संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. 

अमेरिका

01:19 PM

संपूर्ण देश भव्य सोहळ्याचा साक्षीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली. संपूर्ण देश या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा साक्षीदार झाला. यावेळी, अयोध्येतील सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

01:01 PM

प्रभू श्रीराम मंदिरात रामाची आरती सुरु

Ram temple

12:45 PM

मंदिर परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

12:43 PM

नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेदरम्यान पूजा करत आहेत. त्यांच्या शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आहेत.
 

12:36 PM

नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाची प्राण प्रतिष्ठापणा, पाहा मंदिरातील फोटो

12:08 PM

नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल

12:05 PM

राम मंदिर परिसरात कलाकारांकडून गीत गायन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेआधी प्रसिद्ध गायक राम गीते गात आहेत. सोनु निगम, अनुराधा पोडवाल, शंकर महादेवन यांनी आपले गीत यावेळी सादर केले. 

11:32 AM

राम मंदिर परिसरात सचिन तेंडुलकर दाखल

11:11 AM

पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरमधून टिपलेले अयोध्येचे दृश्य

11:09 AM

अलिबागमध्ये भव्य बाईक रॅली

अलिबाग : अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सारा रायगड जिल्हा हा राममय झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरात, गावात हा आनंदोत्सव साजरा होत आहे. अलिबाग शहरातही राममय वातावरण निर्माण झाले आहे. सकल हिंदू समाज तर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी रामाचा जयघोष करीत रॅली शहर भर फिरवून रामनाथ येथील पुरातन राम मंदिरात रॅली चे विसर्जन झाले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई ही रॅलीत सहभागी झाली होती.


 

10:59 AM

नाशिक शहर 'राममय'

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघे नाशिक शहर राममय झाले आहे. रस्ता रस्ते भगवे ध्वज, जय श्रीरामाचे मंदिराच्या देखाव्याच्या प्रतिकृतीचे फलक  लावण्यात आले आहे. फुल बाजार देखील तेजीत आहे. फुलांचे हार, विविध फुले, खरेदी करण्यावर नाशिककरांचा भर आहे.
 

10:57 AM

नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सर्वात आधी ते हनुमान गढीकडे जाण्याची शक्यता आहे. 

10:53 AM

अनेक मंडळी अयोध्येत होतायेत दाखल 

बाबा रामदेव, सायना नेहवाल, राजकुमार हिराणी, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कॅटरिना कैफ, विवेक ओबेरॉय, चिरंजीवी, राम चरण, अनुपम खेर, सोनू निगम, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक जण अयोध्येत दाखल झाले आहे.

10:45 AM

हा एक अद्भुत प्रसंग - अनिल कुंबळे

हा एक अद्भुत प्रसंग आहे, एक अतिशय दैवी प्रसंग आहे. याचा एक भाग होण्याचा आनंद आहे. हे खूप ऐतिहासिक आहे. राम लला यांच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक आहे, असे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी म्हटले आहे.

 

10:41 AM

मोहन भागवत अयोध्येत दाखल; रामभक्तांना केलं अभिवादन

अयोध्येत श्रीराम मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उद्योगपती अनिल अंबानी, अमिताभ बच्चन , अभिषेक बच्चन , अरुण गोविल दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी उपस्थित राम भक्तांना अभिवादन केले. काही वेळातच प्राण प्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होणार आहे.

10:32 AM

रामललाच्या आरतीवेळी घंटानाद; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 

अयोध्येतील रामललाच्या प्रतिष्ठापणेचा क्षण जवळ आला आहे. रामललाच्या आरतीवेळी घंटानाद करण्यात येणार आहे. तसेच, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

09:40 AM

रामभक्तांची अयोध्येत उपस्थिती

अयोध्येत राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे. 

09:33 AM

अयोध्येत रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत लता मंगेशकर चौकात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहे. प्राण प्रतिष्ठेपूर्वी सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.

09:31 AM

आज खरी दिवाळी - अनुपम खेर

आज खरी दिवाळी आहे. मी आज लाखो काश्मिरी हिंदूंचं प्रतिनिधित्व करत आहे. राम आपल्या घरी परत येत आहेत, अशी भावना अयोध्येत आलेले अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.

09:24 AM

राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण

राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे.

Ram temple

09:17 AM

'देवलोक'कडून आमंत्रण मिळाल्यासारखे वाटते - कैलाश खेर

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रोहित शेट्टी अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येत उपस्थित असलेले गायक कैलाश खेर म्हणाले, 'खूप उत्साह आहे, कारण आम्हाला 'देवलोक'कडून आमंत्रण आले आहे आणि 'देवाने' स्वतः आमंत्रित केले आहे. आजचा दिवस असा पवित्र दिवस आहे की, केवळ भारतातच नव्हे तर 'तिन्ही जगात' उत्सव आहे.

09:01 AM

महाराष्ट्र आणि अयोध्येचे आत्मीयतेचे नाते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : आता संपूर्ण देशात सर्वत्र राममय वातावरण तयार झाले आहे. आज प्रत्येक घरात राम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाण्यात केले. महाराष्ट्र आणि अयोध्येचे आत्मीयतेचे नाते आहे. राम मंदिराच्या उभारणीकरिता लागलेले लाकूड हे चंद्रपूर येथून पाठविले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ठाण्यातील उपवन तलाव येथे रविवारी रात्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाआरती झाली.
 

08:54 AM

अयोध्येत उत्साहाचे वातावरण

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्साहाच वातावरण दिसून येत आहे. या ठिकाणी राम आणि सीता वेष परिधान करुन बाल कलाकार फिरत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून साधुसंत, महंत, कथावाचक आणि भागवत कथा सांगणारे प्रकांड पंडित पोहोचले आहेत. 

08:19 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक 

> सकाळी १०.२५ :  पीएम मोदी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील
> सकाळी १०.४५ - अयोध्या हेलिपॅडवर आगमन
> सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत :  मोदी मंदिर परिसरात विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होतील.
> दुपारी १२.०५ ते १२.५५ पर्यंत – प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी होईल.
> (यादरम्यान श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शुभ मुहूर्तावर होईल)
> दुपारी ०१.०० -  मोदी समारंभाच्या ठिकाणी पोहोचतील.
 

08:10 AM

देशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन

08:07 AM

सचिन तेंडुलकर दाखल, अमिताभ बच्चन मुंबईहून रवाना

अयोध्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू आहे. सचिन तेंडुलकर अयोध्येला पोहोचला आहे. तसेच, अभिनेते अमिताभ बच्चन मुंबईहून रवाना झाले आहेत. 

08:04 AM

राम चरण यांच्यानंतर चिरंजीवी सुद्धा हैदराबादहून रवाना

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतीलअभिनेते राम चरण यांच्यानंतर आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिरंजीवीही हैदराबादहून अयोध्येला रवाना झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हे दोन्ही कलाकार अयोध्येत दाखल होत आहेत.

07:40 AM

११४ कलशांतील जलाने अभिषेक

07:39 AM

जगभरातील ५५ देशांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त विविध कार्यक्रम

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठाचे कार्यक्रम विदेशात होणार आहे. जगभरातील ५५ देशांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 

07:31 AM

देशभर उत्साह, प्रत्येक शहरात कार्यक्रम, देशभरातील वातावरण भक्तीमय

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील वातावरण भक्तीमय झाले आहे.

07:29 AM

अडीच हजार क्विंटल फुलांनी सजली अयोध्या

07:18 AM

कसा असेल मुख्य सोहळा?

सकाळी १०:३० वाजल्यापासून निमंत्रितांचे मंदिर परिसरात आगमन होण्यास सुरुवात होईल, केवळ निमंत्रण असलेल्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा मुख्य सोहळा १२:२० वाजता सुरू होईल. अभिजित मुहूर्तावर होणाऱ्या मुख्य पूजेसाठी १२ वाजून २९ मिनिटे व ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे व ३२ सेकंदांपर्यंतचा ८४ सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे. वाराणसीचे आचार्य गणेश्वर द्रविड व आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात व १२१ पुरोहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.
 

Web Title: ayodhya ram mandir pran pratishtha ram lalla narendra modi Inauguration live updates in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.