बागेश्वर बाबांच्या मंडपात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, पोलिसांनाही आवरेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:52 PM2023-07-12T17:52:01+5:302023-07-12T17:52:29+5:30

कालही शास्त्रींच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Bageshwar Baba's dhirendra shastri katha pandal mandap stampede Noida, UP; Many injured, even the police | बागेश्वर बाबांच्या मंडपात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, पोलिसांनाही आवरेनात

बागेश्वर बाबांच्या मंडपात चेंगराचेंगरी; अनेक जखमी, पोलिसांनाही आवरेनात

googlenewsNext

ग्रेटर नोएडातून बागेश्वर बाबांबाबत बातमी येत आहे. धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींच्या कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. शास्त्री यांच्या दर्शनासाठी आलेली गर्दी अनियंत्रित झाली आणि अनेक लोक बेशुद्ध पडले, खाली पडल्याने अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. 

कालही शास्त्रींच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्या लोकांवर सुरक्षेची जबाबदारी होती त्यांनी भक्तांसोबत बाचाबाची झाल्यावर त्यांच्या एका मागोमाग एक कानशिलात वाजविल्याचा प्रकार घडला होता. काही लोकांनी यात मध्यस्थी करून या भक्तांना सोडविले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

यातच आज खूप गर्दी झाल्याने बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची श्रीमद भगवद गीता कथा सुरू आहे. बुधवारी दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले, त्यामुळे दरबारात आलेले भाविक नाराज झाले. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक बेशुद्ध झाले. अनेकांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्यासाठी ताकद लावली. पोलिसांनी त्यांना समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Web Title: Bageshwar Baba's dhirendra shastri katha pandal mandap stampede Noida, UP; Many injured, even the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.