यूपी एसटीएफला मोठं यश, आतिक अहमदच्या भावाच्या मेहुणा सद्दामला दिल्लीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 02:20 PM2023-09-28T14:20:47+5:302023-09-28T14:21:10+5:30

उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफला आणखी एक यश मिळाले आहे.

Big success for UP STF, Atiq Ahmed's brother-in-law Saddam arrested from Delhi | यूपी एसटीएफला मोठं यश, आतिक अहमदच्या भावाच्या मेहुणा सद्दामला दिल्लीतून अटक

यूपी एसटीएफला मोठं यश, आतिक अहमदच्या भावाच्या मेहुणा सद्दामला दिल्लीतून अटक

googlenewsNext

यूपी एसटीएफला मोठं यश मिळालं आहे. एसटीएफने माफिया अतिक अहमदचा भाऊ अशरफचा मेहुणा सद्दाम याला दिल्लीतून अटक केली आहे. सद्दामवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सद्दाम हा अनेक दिवसापासून फरार होता, एसटीएफ त्याचा शोध घेत होते, अटक टाळण्यासाठी सद्दाम नेहमी आपलं ठिकाणं बदलत होता.

"शेवटच्या श्वासापर्यंत थांबणार नाही"; फ्री ऑटो ॲम्ब्युलन्स चालवून वृद्धाने वाचवले शेकडो जीव

माफिया अश्रफचा मेहुणा सद्दामविरुद्ध बरेलीच्या बिथरी चैनपूर आणि बारादरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. यूपी एसटीएफने सद्दामला दिल्लीतील मालवीय नगर परिसरातून अटक केली आहे. सद्दाम हा प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सद्दाम बरेलीतील खुशबू एन्क्लेव्हमध्ये राहत होता, कारण त्याचा मेहुणा अशरफ बरेली तुरुंगात बंद होता. यावेळी तो तुरुंग कर्मचाऱ्यांच्या संगनमताने कारागृहात रसद पोहोचवत होता. अश्रफ तुरुंगात गेल्यानंतर सद्दाम हा अश्रफचा व्यवसाय सांभाळायचा आणि तुरुंगात येणाऱ्या लोकांची अश्रफशी ओळख करून देत होता. सद्दामने बरेली तुरुंगाची व्यवस्थाही सांभाळली. उमेश पाल गोळीबार प्रकरणात सहभागी असलेले आरोपीही  तुरुंगात अश्रफला भेटले होते. सद्दामने या लोकांची अश्रफशी ओळखही करून दिली होती.

बरेली तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सद्दामची भूमिका स्पष्ट झाली. यानंतर बरेली पोलिसांनी सद्दामविरुद्ध बिथरी चैनपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. उमेश पाल गोळीबार प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सद्दाम दुबईला पळून गेला होता. बरेली पोलिसांनी फरार घोषित केलेल्या सद्दामवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Web Title: Big success for UP STF, Atiq Ahmed's brother-in-law Saddam arrested from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.