राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:23 PM2024-02-04T18:23:18+5:302024-02-04T18:25:15+5:30

मंदिराचे काम कुठल्याही स्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Big update regarding Ram Mandir, ram darbar will be decorated on the first floor Work will be completed by December 31 | राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!

राम मंदिरासंदर्भात आली मोठी अपडेट, पहिल्या मजल्यावर काय असणार? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम!

अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचे काम तत्काळ सुरू करण्या येईल. पहिल्या मंजल्यावर प्रभू श्रीराम यांचा दरबार असेल. नृपेंद्र मिश्रा शुक्रवारी मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. मंदिराचे काम कुठल्याही स्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी मिश्रा यांनी इंजिनिअर्स, अधिकारी आणि इतर लोकांसोबत बैठक केली आणि डिसेंबरपर्यंत मंदिराची तटबंदी तसेच पहिला आणि दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. या बैठकीत कंपनीचे अधिकारी, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, स्थानीय प्रशासन आणि पोलीस अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय, मंदिराभोवती 795 मीटर परिक्रमा भिंतीचे कामही पूर्ण करावयाचे आहे. तसेच मंदिराच्या खालच्या बाजूला शिल्पकामही लवकरच सुरू होणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.

गेल्या 22 जानेवारीला राममंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र अद्याप मंदिराची काही कामे बाकी आहेत. येथे राम ललांचे दर्शन घेण्यासाठी लोखो लोक पोहोचत आहेत. याशिवाय भाविक मुक्त हस्ताने देणग्याही देत आहेत. आतापर्यंत मंदिरात रोज दोन वेळा आरती होत होती. आता 6 वेळा आरती होईल. रामललाच्या पुजाऱ्यांचे प्रशिक्षक आचार्य मिथलेश नंदिनी शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला आरती, श्रंगार, भोग, उत्थापन, संध्या आणि शयन आरती होईल.

Web Title: Big update regarding Ram Mandir, ram darbar will be decorated on the first floor Work will be completed by December 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.