डिव्हाईडरवर आदळली बस, मागून आली कार; भीषण अपघातात ५ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:34 AM2024-02-12T11:34:52+5:302024-02-12T11:40:48+5:30
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
मथुरा येथील महावन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताची भीषण घटना घडली. डबलडेकर स्लीपर बसवरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस डिव्हाईडरवर जाऊन आदळली. त्यातच, पाठिमागून येणारी स्वीफ्ट डिझाईर कार बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत कारमधील ५ जणांचा जळून मृत्यू झाला. तर, बस आणि कार जळून खाक झाली आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: मथुरा में यमुना एक्सप्रेसवे पर एक बस और कार की टक्कर हो गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/G7gJ0pIQs9
— ANI_HindiNews (@AHindinews) February 12, 2024
आग्र्याहून ही बस नोएडा येथे जात होती. दरम्यान, डिव्हाईडरला धडकल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघाताला कारणीभूत ठरले. दरम्यान, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. पण, कारमधील सर्वच प्रवाशांच्या जीवावर बेतले.