उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:25 IST2025-03-14T18:23:05+5:302025-03-14T18:25:28+5:30

उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होळी आणि जुम्याची नमाज शांततेत पार पडली. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे शाहजहांपूर येथे याला गालबोट लागले...

chaos during Holi procession in Uttar Pradesh, stone pelting lathi charge; police chased and beat up people | उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

आज संपूर्ण देशभरात होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा झाला. उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होळी आणि जुम्याची नमाज शांततेत पार पडली. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे शाहजहांपूर येथे याला गालबोट लागले. येथे तीन ठिकाणी मिरवणुकीदरम्यान हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता, हुल्लडबाजांनी दगडफेक करायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनीही लोठीचार्ज केला आणि हुल्लडबाजांना पळवत पळवत चोपले. ही घटना सदर बाजार पोलिसठाण्याच्या हद्दीतील खेरनीबाग भागात घडली. याशिवाय, बडे लाट साहेबांच्या मिरवणुकीदरम्यान, घंटाघर येथे आरएएफ पथकाने दंगलखोरांवर लाठीचार्ज केला.

येथे दरवर्षी 'लाट साहब' यांची मिरवणूक निघते. यावेळी  शुक्रवार असल्याने मिरवणुकीसंदर्भात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. रस्त्यात येणारी मशीत आधीच ताडपत्रीने झाकण्यात आली होती. मुस्लीम समाजाने नमाजची वेळही पुढे ढकलली होती. दरम्यान 'लाट साहब' मिरवणुकीवेळी गोंधळ झाल्याने पोलिसांनी होळी खेळत असलेल्या लोकांवर लाठीचार्ज केला. यावेळी नाराज झालेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पुलीस लाठीचार्जमध्ये बरेच लोक डखमी झाले आहेत.

'लाट साहब' मिरवणुकीदरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खिरणी बाग चौकाजवळ लाठीचार्जची घटना घडली. तेथे मिरवणुकीत चालणारे लोक आणि पोलिस एकमेकांशी भिडले. यानंतर पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या लोकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी रंग खेळणाऱ्या आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांचा पाठलाग करत त्यांच्यावर लाठीचार्ज केला. 

याशिवाय, आरएएफने खिरणीबाग चौकातही लाठीचार्ज केला. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणालाही आरएएफने चोपले. याशिवाय त्याच्या दुचाकीचेही नुकसान करण्यात आले.

याशिवाय, चौक कोतवाली परिसरातील कच्चा कटरा वळणावर दोन गटांमध्ये जोरदार हणामारी झाली. विशेष म्हणजे, येथे उपस्थित पोलिस कर्मचारी केवळ मूकदर्शक बणून बघत होते. याशिवाय, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंखी चौराहा येथेही हुल्लडबाजांनीही गोंधळ केला. 

Web Title: chaos during Holi procession in Uttar Pradesh, stone pelting lathi charge; police chased and beat up people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.