मालगाडीच्या चाकात अडकलेल्या चिमुकल्याचा 100 किमीचा प्रवास; सुरक्षा दलाने केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:19 PM2024-04-22T15:19:06+5:302024-04-22T15:20:09+5:30
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Indian Railway : उत्तर प्रदेशातील लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक चिमुकला रेल्वे स्टेशनजवळ खेळता-खेळता मालगाडीवर चढला अन् तेवढ्यात गाडी सुरू झाली. यामुळे तो खाली उतरू शकला नाही आणि गाडी थेट 100 किमी दूर थांबली. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची सुटका केली. सध्या तो मुलगा चाईल्ड केअर सेंटरमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये रेल्वे रेल्वे स्टेशनजवळ राहणारा एक 8-10 वर्षांचा मुलगा खेळता-खेळता मालगाडीच्या चाकांमध्ये जाऊन बसला. यानंतर मालगाडी सुरू झाली, ज्यामुळे मुलाला खाली उतरता आले नाही. अशा प्रकारे मालगाडीच्या चाकांमध्ये अडकून पडला आणि थेट लखनौपासून 100 किमी दूर असलेल्या हरदोईपर्यंत पोहचला. मुलगा चाकात अडकल्याची माहिती रेल्वेला लागल्यानंतर हरदोईमध्ये वाहन थांबवण्यात आले.
मालगाड़ी के पहियों के बीच बैठकर #हरदोई पहुँचा बच्चा !!#आरपीएफ़ ने किया रेस्क्यू, रेलवे ट्रैक के किनारे रहने वाला है मासूम !!
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) April 21, 2024
खेलते खेलते ट्रैक पर खड़ी मालगाड़ी पर चढ़ा, मालगाड़ी चल दी और बच्चा नहीं उतर पाया !!
रेलवे सुरक्षा बल के जवानों ने बच्चे को उतारा, बच्चे को चाइल्ड केयर… pic.twitter.com/By2c9UqJFq
यानतंर हरदोई रेल्वे संरक्षण दलाला ही माहिती देण्यात आली. हरदोई रेल्वे स्थानकावर मालगाडी थांबवून रेल्वे सुरक्षा दलाने मुलाची सुटका केली. यानंतर त्या मुलाला हरदोई चौकीत आणले. मुलाची जेव्हा सुटका करण्यात आली, तेव्हा तो खूपच घाबरला होता. चौकशीत मुलाने आपले नाव अजय पूरण, रा. बालाजी मंदिर, लखनौ असल्याचे सांगितले. मुलाचे नाव आणि पत्ता विचारल्यानंतर बाल संगोपन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, त्या मुलाला चाकांमधून बाहेर काढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.