भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 06:18 PM2023-09-02T18:18:57+5:302023-09-02T18:20:28+5:30

घटनेबाबत माहिती देताना खुदगंज निवासी अनिल यांनी सांगितले की, श्रावण महिना संपत असल्याने शुक्रवारी गावच्या देवळात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Chimkulya was beaten and teeth knocked out as Bhandara came to eat in Bareli | भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले

भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले

googlenewsNext

बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली येथील मीरगंज पोलीस हद्दीत एका लहान मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. खुदागंज येथे ७ वर्षीय चिमुकला आयुष हा एका भंडाऱ्यात जेवणासाठी गेला होता. त्यावेळी, भंडारास्थळी असलेल्या गावातील दोघांनी त्याला जबर मारहाण करत ढकलून दिला. त्यामध्ये, लहानग्य आयुषचे दोन दात पडले असून त्याला जखमही झाली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

घटनेबाबत माहिती देताना खुदगंज निवासी अनिल यांनी सांगितले की, श्रावण महिना संपत असल्याने शुक्रवारी गावच्या देवळात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्यासाठी गावातील लोकांकडून वर्गणी स्वरुपात काही रक्कम गोळा करण्यात आली होती. मात्र, आयुषच्या वडिलांनी आर्थिक तंगीमुळे ही रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगितले. मात्र, देवाचा प्रसाद असल्याने भंडारा खान्यासाठी आयुष व त्याचे वडिल मंदिरात आले होते. मात्र, या दोघांना पाहून काही लोकांनी संताप व्यक्त केला. यावेळी, गावातील ब्रदीप्रकाश आणि गुड्डू या दोघांनी आयुषला मारहाण केली. 

दरम्यान, दोघांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत चिमुकल्या आयुषला मोठी दुखापत झाली असून त्याचे दातही पडले आहेत. मुलगा घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी मुलाची प्रकृती पाहून संताप व्यक्त केला. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ते गेले असता, उलट त्यांनाच शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे, मुलाच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Chimkulya was beaten and teeth knocked out as Bhandara came to eat in Bareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.