Crime: अनैतिक संबंध, पत्नीने रचला भयानक कट, पतीला चॉकलेट घ्यायला पाठवलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:17 PM2023-10-03T16:17:47+5:302023-10-03T16:18:14+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधांत गुंतलेल्या एका पत्नीने भयानक कट रचून प्रियकराच्या मतदीने मिळून पतीची हत्या घडवून आणली.
उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथून पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. येथे अनैतिक संबंधांत गुंतलेल्या एका पत्नीने भयानक कट रचून प्रियकराच्या मतदीने मिळून पतीची हत्या घडवून आणली. गाझीपूरमधील खानपूर ठाणे परिसरातील सिधौनाजवळ २९ सप्टेंबर रोजी दिवसाढवळ्या एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी उलगडा केला आहे.
एसपी ओमवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या भयानक हत्याकांडाची माहिती दिली. अनैकित संबंधांमधून पत्नीने कट रचून पतीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मृताच्या पत्नीने तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध झाल्याचेही मान्य केले. एसपी गाझीपूर यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर रोजी मोबाईल विक्रेते स्वतंत्र भारती याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान पोलीस तपासामध्ये मृत स्वतंत्र भारतीची पत्नी कंचन गिरी हिचे वीरू नावाच्या तरुणासोबत लग्नापूर्वीपासून संबंध असल्याचे तसेच मार्च महिन्यात कुटुंबीयांच्या दबावामुळे तिने स्वतंत्र भारती याच्यासोबच विवाह केल्याचे समोर आले. कंचन ही या विवाहामुळे खूश नव्हती. तसेच विवाहानंतरही तिचे संबंध वीरू आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत कायम राहिले.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना घडली त्या दिवशी कंचनने दुकान बंद केल्यानंतर पतीला वीरूकडे ठेवलेले चॉकलेट आणण्यासाठी पाठवले. मात्र तिथेच रस्त्यामध्ये वीरू आणि त्याचे दोन साथीदार गोविंद यादव आणि गामा बिंद यांनी मिळून स्वतंत्रवर गोळीबार केला. त्यात त्याच्या मृत्यू झाला. त्यानंतर हे आरोपी फरार झाले होते. पोलीस तपास आणि मोबाईल सर्व्हिलान्समध्ये या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. तसेच मृताच्या पत्नीच्या कॉल डिटेल्समधूनही अनेक गोष्टी समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर कंचनने गुन्हा मान्य केला.
सध्या पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपी गोविंद यावद आणि गामा बिंद तसेच मृताची पत्नी कंचन यांना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी वीरू यादव याचा शोध सुरू आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी, कट्टा आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.