लग्नघरी मृत्यूचं तांडव, सख्ख्या भावांसह सहा जणांची हत्या, नवरा-नवरीला मारून स्वत:लाही संपवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 08:46 AM2023-06-25T08:46:50+5:302023-06-25T08:47:10+5:30
Crime: घरगुती वादातून मोठ्या भावाने सख्ख्या भावासह कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केली आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घरातील लग्नाचा आनंद काही क्षणात दुःखात बदलला.
मैनपुरी : घरगुती वादातून मोठ्या भावाने सख्ख्या भावासह कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केली आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घरातील लग्नाचा आनंद काही क्षणात दुःखात बदलला. मारेकऱ्याच्या लहान भावाचे लग्न आटोपून वरात घरी परतली होती. तो आणि नववधूलाही पास्कल्याने संपवले उत्तर प्रदेशतीक मैनपुरी जिल्ह्यातील गोकुलपूर गावात ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सोनू उर्फ अरुणचे लग्न आटोपून शुक्रवारी सायंकाळी वरात परतली होती. सर्व वराती जल्लोष करून झोपले होते. पहाटे दोन वाजताच्या सुमारास मोठा 'भाऊ शिववीर याने कुन्हाडीने हल्ला करून सोनू, त्याची नववधू सोनी, मेहुणा सौरव, मित्र दीपक यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. त्याने स्वतःची पत्नी आणि मामीवरही हल्ला कला मोत्र, त्या बचावल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. (वृत्तसंस्था)
२० दिवसांपूर्वीच आला होता लग्नासाठी
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी शिववीर हा नोयडा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. भावाच्या लग्नासाठी तो २० दिवसापूर्वी गावी आला होता.