राम मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना प्रवेश नाही; ३५ फूट अंतरावरूनच मिळणार दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:35 AM2023-08-14T05:35:41+5:302023-08-14T05:35:56+5:30
येथील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी पातळीवर सुविधा देण्याची तयारी सुरू आहे.
लखनौ : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात केले जाणार आहे. मंदिर खुले झाल्यानंतरही रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही. भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही. सुमारे ३५ फूट अंतरावरून लोकांना दर्शन घेता होईल.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिराच्या पुजाऱ्याला आहे. ही पारंपरिक पद्धत लक्षात घेऊन केवळ पंतप्रधान आणि पुजारी यांनाच गर्भगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुजाऱ्यांना सुविधा...
येथील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी पातळीवर सुविधा देण्याची तयारी सुरू आहे. श्री रामजन्मभूमीचे मुख्य वास्तुविशारद आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, श्री राम मंदिर ट्रस्ट आता रामललाच्या सेवेत नियुक्त पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी स्तरावरील सुविधा पुरवणार आहे. पुजाऱ्यांच्या निवास आणि वैद्यकीय सुविधांसोबत निवासी भत्ताही दिला जाणार आहे.