डॉक्टरसाहेब, मला वाचवा, मी विष घेतले आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:37 AM2024-01-31T06:37:25+5:302024-01-31T06:37:53+5:30
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली.
उत्तर प्रदेशातील संभळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कुटुंबातील भांडणानंतर एका व्यक्तीने विष प्राशन केले. मात्र, आपला मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात येताच त्याने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याने डॉक्टरांना वाचवण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल
झाला आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार, एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरचा पळत पळत शोध घेत आहे. यावेळी ती रडत असून, मी विष प्राशन केले आहे, कृपया माझे प्राण वाचवा, अशी याचना करताना दिसत आहे.
यावेळी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीवर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेवर आल्याने त्याचा जीव वाचेल, अशी एक व्यक्ती बोलताना दिसत आहे. सतेंद्र असे या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तेथे पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली.
मुलगा डिप्रेशनमध्ये असून, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कधी तो बेशुद्ध पडतो, तर कधी विष प्राशन करण्याबद्दल बोलतो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले असले तरी नंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. येथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.