नोकरी नसेल, तरीही पत्नीला पोटगीचे पैसे द्यावेच लागतील, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:16 AM2024-01-29T06:16:11+5:302024-01-29T06:16:30+5:30
Allahabad High Court: पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरीही तो आपल्या पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे, कारण तो अकुशल कामगार म्हणून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमवू शकतो, असा निर्णय अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला.
लखनौ - पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरीही तो आपल्या पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे, कारण तो अकुशल कामगार म्हणून दररोज सुमारे ३०० ते ४०० रुपये कमवू शकतो, असा निर्णय अलाहाबाद कोर्टाच्या लखनौ खंडपीठाने दिला.
न्यायमूर्ती रेणू अग्रवाल यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुरुषाची पुनर्विचार याचिका फेटाळून लावताना ही निरीक्षणे नोंदवत त्याला त्याच्या विभक्त पत्नीला मासिक २,००० रुपये भरपाई देण्यास सांगितले. २०१५ मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. पत्नीने हुंड्याच्या मागणीवरून सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि २०१६ मध्ये आई-वडिलांसोबत राहण्यासाठी घर सोडले.
पतीचे म्हणणे...
पतीने म्हटले की, पत्नी पदवीधर आहे आणि शिकवणीतून महिन्याला १०,००० रुपये कमवत आहे, तो गंभीर आजारी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो मजूर म्हणून काम करतो आणि भाड्याच्या खोलीत राहतो आणि त्याला त्याच्या आई-वडील आणि बहिणींची काळजी घ्यावी लागते.