मोठा निष्काळजीपणा! रुग्णालयात मुलावर चुकीचे उपचार, हात कापण्याची वेळ; वडिलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 10:16 AM2023-07-05T10:16:59+5:302023-07-05T10:32:37+5:30
लखनौमध्ये दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की मुलाचा हात कापावा लागेल.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका खासगी रुग्णालयात चुकीच्या औषधामुळे एका मुलाच्या हाताची अवस्था गंभीर झाल्य़ाचा आरोप करण्यात आला आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोग्य विभागाच्या पथकाने तपास सुरू केला आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, हॉस्पिटलमध्ये मुलाच्या उपचारात निष्काळजीपणा करण्यात आला होता, त्यामुळे मुलाच्या हाताला संसर्ग झाला. लखनौमध्ये दाखवल्यावर तेथील डॉक्टरांनी सांगितले की मुलाचा हात कापावा लागेल.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सिटी कोतवाली परिसरातील नेहरू क्रॉसिंगजवळील सत्यम हॉस्पिटलशी संबंधित आहे. लालगंज येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र शर्मा यांनी आपल्या मुलाला येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया म्हणून उपचार सुरू केले आणि ड्रिप चढवण्यासाठी हाताला वीगो लावला. वीगो लावल्यामुळे मुलगा खूप अस्वस्थ झाला. वडील सुरेंद्र यांच्या हे लक्षात आलं.
वडिलांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे तक्रार केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरेंद्रच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांनी स्वत: वीगो काढून टाकले. यानंतर मुलाच्या हाताला जखम झाल्याची दिसून आले. सुरेंद्र यांनी मुलाला डिस्चार्ज दिल्यानंतर लखनौमध्ये दाखवले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की, मुलाला गँगरीन झालं आहे, त्याचा हात कापावा लागेल. यानंतर सुरेंद्रने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, त्यांनी आरोग्य विभागाला योग्य उपचार करण्याचा सल्ला देत चौकशी करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सीएमओने चौकशी समिती स्थापन केली, जी चौकशीसाठी सत्यम हॉस्पिटलमध्ये पोहोचली. टीमने तिथल्या हॉस्पिटलच्या ऑपरेटरशी अनेक तास चर्चा केली. सुरेंद्र शर्मा म्हणाले की, मी डीएम कार्यालयात आलो आहे. मुलाला ताप आला होता. 13 जून रोजी सत्यम रुग्णालयात दाखल केले. वीगो चुकीच्या ठिकाणी लावल्याने संसर्ग पसरतो. आम्ही बोललो तेव्हा ते योग्य होईल असे सांगण्यात आले. ते योग्य होणार नाही असे वाटल्यावर एम्सला गेलो. हात कापावा लागेल, असे एम्समध्ये सांगण्यात आले. त्याच्यावर उपचार करा, जी काही कारवाई होईल, ती करू, असे डीएम म्हणाले.
रुग्णालयाचे संचालक डॉ. आशुतोष सिंह यांनी सांगितले की, मुलाला न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता, त्याचे वजन खूपच कमी होते. येथून उपचार घेतले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला स्वतःच्या जबाबदारीवर घेतले आणि 10 दिवसांनंतर आता ते रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत. त्याची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. तपासात सत्य समोर येईल, तेही तपास अहवालाची वाट पाहणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.