ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:57 PM2023-08-05T12:57:40+5:302023-08-05T12:57:55+5:30

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी ASI सर्वेक्षण सुरू

Gyanwapi ASI Survey Mosque Door Opened but Muslim Party Refuse to open Basement | ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

ज्ञानवापी सर्व्हे: मशिदीचा दरवाजा उघडला, तळघराची चावी देण्यास मुस्लिम पक्षकारांचा नकार

googlenewsNext

Gyanvapi Mosque ASI Survey: उत्तर प्रदेशच्या ज्ञानवापी मध्ये एएसआयची टीम शनिवारी दुसऱ्या दिवशी संपूर्ण कॅम्पसचे सर्वेक्षण करत आहे. या दरम्यान मशिदीचे केअरटेकर एजाज अहमद यांनी सांगितले की, आज मशिदीचे कुलूप उघडण्यात आले आहे. एएसआयची टीम बाथरूममधून बाहेर पडून मशिदीत घुसली, मशिदीच्या आतही सर्वेक्षण केले जात आहे. त्याच वेळी या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम पक्षकारांनी त्यांच्या ताब्यातील तळघर उघडण्यास मात्र नकार दिला आहे.

मुस्लीम पक्षाचे वकील मुमताज अहमद यांनी ज्ञानवापी कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर सांगितले की, आम्ही सर्वेक्षणाला पूर्ण सहकार्य करत आहोत. मात्र, तळघराची चावी कशाला द्यायची, ते जिथे उघडायचे आहे तिथे उघडेल, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की ASI टीम अजूनही वरच्या भागाचे सर्वेक्षण करत आहे. शुक्रवारीही तळघरात सर्वेक्षणाचे काम होऊ शकले नाही, कारण एकाही मुस्लिम पक्षकाराने कुलूप उघडले नाही आणि चावीही दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तळघरात कचऱ्याचा ढीग असल्याने लांबी-रुंदी मोजण्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने आज तळघर उघडून साफसफाई करावी लागली.

सर्वेक्षणात मुस्लिम बाजू सामील झाली

एएसआय सर्वेक्षणात सामील होण्यापूर्वी अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचे संयुक्त सचिव मोहम्मद यासीन म्हणाले की आम्ही कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहत होतो. आता न्यायालयाने सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने आम्ही ASI सर्वेक्षणात पूर्ण सहकार्य करू. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वेक्षणात मुस्लिम पक्षाचा एकही सदस्य सहभागी झाला नाही. दुसरीकडे, हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, आज तपशीलवार पद्धतीने काम केले जाईल, जे पुढील सर्वेक्षणाचे स्वरूप ठरवेल. वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाचा कालावधी 4 आठवड्यांनी वाढवला आहे.

दरम्यान, ज्ञानवापीच्या परिसरातील मशिदीच्या भागात सर्व्हे करण्यास जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Gyanwapi ASI Survey Mosque Door Opened but Muslim Party Refuse to open Basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.