पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 15:28 IST2023-07-06T15:27:56+5:302023-07-06T15:28:06+5:30

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली.

husband asked his wife about money, wife brutally beat her husband with sticks | पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला त्याच्या पत्नीकडे पैशांचा हिशेब मागणे खूप महागात पडले. पैशाचा हिशेब मागितल्यामुळे संतापलेल्या पत्नीने बहिणीच्या मदतीने पतीला लाठ्या-काढ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अकबरपूर कोतवाली परिसरातील बदापूर गावाशी संबंधित आहे. गावातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही महिला एका पुरुषाचे हात-पाय बांधून त्याला काठीने मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

बदापूर गावात राहणारा शिवकुमार बनारसमध्ये आपल्या भावासोबत कुल्फीचा गाडा लावतो. घर चालवण्यासाठी तो दर महिन्याला काही पैसे पत्नीला पाठवत असे. शिवकुमार बनारसहून घरी आला तेव्हा त्याला समजले की, त्याच्या पत्नीने घरातील 8 क्विंटल गहू विकला आहे. शिवकुमारने पत्नीला गहू विकण्याचे कारण विचारले. यासोबत बनारसमधून पाठवलेल्या 32 हजार रुपयांचा हिशेब मागितला. 

शिवकुमारचा हिशेब विचारल्यावर पत्नी सुशीलाने संतापून बहिणीच्या मदतीने पती शिवकुमारचे हातपाय बांधले. यानंतर त्याला लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यादरम्यान शिवकुमार जोरजोरात ओरडत राहिला. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. 

Web Title: husband asked his wife about money, wife brutally beat her husband with sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.