तुझ्यासाठी जीव देईन... प्रेयसीने प्रियकराला चक्क पुलावरुन नदीत ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 05:51 PM2023-07-08T17:51:45+5:302023-07-08T17:56:07+5:30
कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती
उत्तर प्रदेशच्या शाहजहाँपूरच्या मिर्झापूर येथून धक्कादायक प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला आहे. येथे आपल्या प्रेयसीच्या प्रेमासाठी नदीत उडी घेण्याची टिंगल किंवा गंमत जीवावर बेतली असती. कारण, प्रेयसीने गंमती-गमतीत प्रियकराला धक्का दिला. त्यानंतर, प्रियकर उंचावरुन नदीत पडला. पण, सुदैवाने गावकऱ्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. सध्या त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रेयसी आणि तिच्या बहिणीली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोलाघाट पुलावर शनिवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. मिर्झापूर तालुक्यातील उदयपूर भूडा गावची तरुणी आपल्या बहिणीच्या प्रियकरासोबत बाईकवरुन जलालाबाद येथे जात होती. त्यावेळी, कोलाघाट पुलावर तरुणीची तिच्या प्रियकरासोबत भेट झाली. तो जलालाबादच्या मालूपूर येथील रहिवाशी असून तो विवाहित आहे. एकमेकांची भेट झाल्यानंतर हे तिघेजण पुलावर उभे राहून गप्पा मारत होते.
प्रियकराने प्रेयसीला म्हटले की, मी तुझ्यासाठी रामगंगा नदीत उडी घेऊन जीव देऊ शकतो. त्यानंतर, तो पुलाच्या रेलींग कठड्यावर चढला. तरुण नाटक करत असल्याच्या समजातून तरुणीने प्रियकराला धक्का दिला. त्यामुळे, तो युवक थेट नदीत खाली कोसळला. तरुण नदीत बुडत असल्याचे लक्षात येताच, तरुणीने मोठ-मोठ्याने मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी, स्थानिकांनी नदीजवळ गर्दी केली, त्यापैकी काहींनी नदीत उडी घेत त्या युवकाला पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान, घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, युवकाला सीएचसी जरीन आरोग्य केंद्रात घेऊन गेली. तेथून फर्रुखाबाद येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तरुणी आणि तिच्या बहिणीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना गंमती-गंमतीत घडल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.