'दिलफेक' मनीष दुबे; जिथे पोस्टिंग तिथे अफेअर, पत्नी व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 09:14 PM2023-07-13T21:14:15+5:302023-07-13T21:16:22+5:30

SDM ज्योती मौर्य आणि होमगार्ड कमांडंट मनीष दुबे प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत.

jyoti maurya Manish Dubey; manish dubey Affair on every posting, relationship with many women other than wife | 'दिलफेक' मनीष दुबे; जिथे पोस्टिंग तिथे अफेअर, पत्नी व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध

'दिलफेक' मनीष दुबे; जिथे पोस्टिंग तिथे अफेअर, पत्नी व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध

googlenewsNext

लखनौ : SDM ज्योती मौर्य आणि आलोक प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातच आता ज्योतीचा कथित प्रियकर होमगार्ड कमांडंट मनीष दुबे याच्या प्रेमप्रकरणाचे अनेक किस्से समोर आले आहेत. मनीष दुबेसाठी ज्योती मौर्य एकट्याच नव्हत्या, याआधीही त्याची अनेक प्रेम प्रकरणे राहिली आहेत. प्रत्येक पोस्टिंगवर त्याचे कोणत्या ना कोणत्या महिलेशी संबंध होते. प्रेम प्रकरणांपर्यंत ठीक होते, पण ज्योती मौर्यच्या पतीला मार्गातून काढून टाकण्याबाबत भाष्य केल्यामुळे मनीष आणि ज्योतीची अडचण वाढली आहे.

ज्योती मौर्यसोबतच्या प्रेमप्रकरण प्रकरणात मनीष दुबे कायद्याच्या तावडीतून सुटला आहे. डीजी होमगार्ड बीके मौर्य म्हणतात की, कायदा ज्योती-मनीषच्या नात्याच्या विरोधात नाही, पण आलोक मौर्य यांना मार्गावरून हटवण्याबाबत बोलणे हा गुन्हा आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनीष दुबेच नाही तर ज्योती मौर्यही अडचणीत येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष दुबेचे यापूर्वीही अनेक महिलांशी प्रेमसंबंध होते, मात्र कोणीही तक्रार दाखल न केल्यामुळे ते यातून सुटायचे. आलोक मौर्य यांना मार्गातून हटवण्याची भाषा करून त्यांनी आता गुन्हा केला आहे.

मनीष दुबेविरोधात एक खटला न्यायालयातही प्रलंबित आहे. होमगार्डचे डीजी बीके मौर्य यांनी तपास केला असता त्यांची इतर सर्व प्रकरणेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मनीष दुबेची पत्नीही त्याच्याविरोधात आवाज उठवण्याची शक्यता आहे. मनीषच्या प्रत्येक पोस्टिंगची चौकशी होणार आहे. प्रत्येक पोस्टिंगमध्ये मनीषचे प्रेमसंबंध होते. अमरोहा येथे त्याचे एका महिला पत्रकारासोबत सुख जुळले, नंतर त्यांनी लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने मनीषविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण कोर्टात आहे. 

आता या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर डीजी होमगार्डने मनीषविरोधात एफआयआर दाखल करण्याची शिफारस केली आहे. ते राजपत्रित अधिकारी असल्याने काही आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याची पत्नीही दु:खी आहे. मनीषचे आर्य समाज मंदिरातील लग्नाचे एक प्रकरणही न्यायालयात आहे. अशा स्थितीत मनीषच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: jyoti maurya Manish Dubey; manish dubey Affair on every posting, relationship with many women other than wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.