'मला तू आवडतेस...'; घरातील कामवालीने एसपीवर विनयभंगाचा केला आरोप, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:32 PM2023-06-20T12:32:22+5:302023-06-20T12:33:30+5:30

पोलिस अधिकाऱ्यावर घरात काम करणाऱ्या कामवालीने विनयभंगाचा आरोप केला आहे.

kaushambi sp kaushambhi allegedly molested his women servant viral video | 'मला तू आवडतेस...'; घरातील कामवालीने एसपीवर विनयभंगाचा केला आरोप, नेमकं प्रकरण काय?

'मला तू आवडतेस...'; घरातील कामवालीने एसपीवर विनयभंगाचा केला आरोप, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

घरात काम घरकाम करणाऱ्या कामवाली महिलेने एसपींवर विनयभंगाचा आरोप केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेश मधील आहे. यूपीच्या कौशांबी जिल्ह्यात एका महिलेने एसपी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

मुंबईत पोलिसांच्या नोटीस धडकल्या! शाखाप्रमुख, माजी नगरसेवक गद्दार दिन साजरा करणार का? 

 या प्रकरणी आता व्हायरल व्हिडिओची दखल घेत डीजीपी मुख्यालयाने तीन सदस्यीय टीम तयार केली आहे. आयजी रेंज प्रयागराज चंद्रप्रकाश, एसपी चित्रकूट वृंदा शुक्ला आणि सीडीओ प्रतापगड ईशा प्रिया यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. चार दिवसांत तपास पथक संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल डीजीपी मुख्यालयाला सादर करेल. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच आरोप करणाऱ्या महिलेने या संपूर्ण प्रकरणापासून माघार घेत पोलिसांची माफी मागितली आहे.

एसपी निवासस्थानी काम करणारी महिला करारी पोलीस ठाण्याजवळ राहणारी आहे.  पीडित महिलेच्या दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीला यकृताचा गंभीर आजार आहे. तीन महिन्यांपूर्वी ती महिला कौशांबीचे एसपी ब्रजेशकुमार श्रीवास्तव यांच्या घरी काम करण्यासाठी आली. ती एसपींच्या निवासस्थानी दुपारी ४ ते सकाळी ८ या वेळेत एसपींच्या आईची काळजी घेत असे आणि जेवणही बनवत असे. रात्री ती एसपीच्या आईच्या खोलीत झोपायची. महिलेचा आरोप आहे की, १४ जून रोजी रात्री ११ वाजता एसपी ब्रजेश कुमार श्रीवास्तव निवासस्थानी आले आणि त्यांनी दारू पिऊन मासे खाल्ले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, आज मी मीटिंगमध्ये बराच वेळ बसलो आणि त्यामुळे माझ्या पाठीत दुखत आहे. तुम्ही मला मसाज करा. यावेळी महिला मसाज करत असताना एसपींनी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान एसपीने  सांगितले की, मला तू खूप आवडतेस. यावेळी महिलेने विरोध केला. यानंतर  एसपी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी महिलेला जबरदस्ती केली. यावेळी एसपींनी महिलेला ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकण्याची धमकीही दिल्याचे महिलेने सांगितले. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे. महिलेने आता न्याय देण्याची मागणी केली. या व्हिडीओची डीजीपी मुख्यालयाने दखल घेत तीन सदस्यीय टीम तयार केली. आयजी रेंज प्रयागराज चंद्रप्रकाश, एसपी चित्रकूट वृंदा शुक्ला आणि सीडीओ प्रतापगड ईशा प्रिया यांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

महिलेने माफी मागितली

चार दिवसांत तपास पथक संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल डीजीपी मुख्यालयाला सादर करेल. आज सकाळी या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. एसपीवर आरोप करणाऱ्या महिलेने पोलीस कोठडीत पोलीस लाईन गाठली आणि एएसपी समर बहादूर यांच्या उपस्थितीत तिने आपले म्हणणे मागे घेत सांगितले की, प्लेट तुटल्यानंतर एसपीच्या पत्नीने तिला शिवीगाळ करून कामावरून काढून टाकले. यामुळे त्यांनी एसपींवर विनयभंगाचा खोटा आरोप केला आहे. 

Web Title: kaushambi sp kaushambhi allegedly molested his women servant viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.