रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत असणार नाहीत लालकृष्ण आडवाणी, यामुळे ऐन वेळी बदलावा लागला कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:34 AM2024-01-22T09:34:52+5:302024-01-22T09:34:59+5:30
संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते.
भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आज (22 जानेवारी) रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत असणार नाहीत. ते दिल्ली येथील आपल्या निवासस्थानीच या भव्य समारंभाचा आनंद घेतील. थंड आणि खराब हवामान असल्याने त्यांनी अयोध्या दौरा रंद्द केला आहे. आडवाणी 96 वर्षांचे आहेत. यामुळे त्यांची प्रकृती लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी यांना घरी जाऊन राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. यावेळी अडवाणी म्हणाले होते, एवढ्या मोठ्या सोहळ्याला प्रत्यक्षपणे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण, श्रीरामांचे मंदिर हा केवळ पूजेच्या दृष्टीने आपले आराध्य म्हणून त्यांचे मंदिर, असा प्रसंग नही. तर या देशाची पवित्रता आणि या देशाच्या मर्यादेची स्थापना पक्की होण्याचा प्रसंग आहे.
'काय म्हणाले होते आडवाणी' -
आडवाणी म्हणाले होते, एक म्हणजे, एवढ्या वर्षांनंतर, भारताच्या ‘स्व’ च्या प्रतिचे पुनर्निर्माण आम्ही केले. हे आम्ही पुरुषार्थाच्या आधारावर केले. दुसरे म्हणजे, आपली एक दिशा असायला हवी, ती पकडण्याचा प्रयत्नही आपण अनेक दशकांपासून करत होतो. ती आपल्याला मिळाली आहे आणि स्तापन झाली आहे. एक विश्वास सर्वांच्या मनात स्थापित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे वातावरण मंगलमय झाले आहे आणि अशा वेळी आपण प्रत्यक्षपणे तेथे उपस्थित राहून तो प्रसंग पाहू. हे नक्कीच एखाद्या जन्मीचे पुण्य असेल. त्याचेच फळ आम्हाला मिळत आहे. यासीठी मी आपले कृज्ञपणे आभार मानतो. ही तर मागूनही न मिळणारी संधी आहे. तो मिळाला आहे. नक्की उपस्थित असेन...
कसं आहे अयोध्येतील हवामान? -
अयोध्येत सकाळी 6 वाजता 8°C तापमाण नोंदवले गेले. पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट अपेक्षित आहे. यानंतर, पुन्हा सुधारणा होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज किमान तापमान 7 आणि कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहील.