वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 02:01 PM2024-10-09T14:01:00+5:302024-10-09T15:17:45+5:30
अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला आहे. यावेळी आमदार आणि सिंह यांच्यात वादावादी झाली होती.
उत्तर प्रदेशच्या लखीमपुरमध्ये भाजपा आमदाराला पोलिसांच्या समोरच मारहाण करण्यात आली आहे. भाजपा आमदार योगेश वर्मा यांना बार संघाचे अध्यक्ष अवधेश सिंह यांनी कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अर्बन कोऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीवरून हा राडा झाला आहे. यावेळी आमदार आणि सिंह यांच्यात वादावादी झाली होती. यामुळे पुन्हा आज हे गट समोरासमोर आले होते. संतापलेल्या सिंह यांनी रस्त्यावरच वर्मा यांच्यावर हात उगारला. यानंतर अन्य वकिलांनीही आमदारांना घेरले आणि मारहाण केली.
मारहाणीनंतर जेव्हा आमदार गट वकिलांकडे धावून गेला तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत या सर्वांना रोखले. अन्यथा मोठा राडा झाला असता. या मारहाणीमुळे वातावरण तणावाचे झाले आहे. बँकेसमोरच हा राडा झाल्याने शहरभर याची चर्चा सुरु झाली आहे.
वर्मा यांच्यानुसार ते आणि भाजपा कार्यकर्ते मतपत्रिका घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. आधी व्यापारी मंडळाचे नेते राजू अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली. मी त्यांना पाहण्यासाठी आलो तर मलाही मारहाण करण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले.