Lok Sabha Elections 2024: समाजवादी पार्टीचे 'जनता का मांग पत्र' जाहीर; मोफत मोबाईल डेटा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 04:11 PM2024-04-10T16:11:28+5:302024-04-10T16:23:17+5:30

समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Lok Sabha Elections 2024 Samajwadi Party President Akhilesh Yadav has released the manifesto for the elections | Lok Sabha Elections 2024: समाजवादी पार्टीचे 'जनता का मांग पत्र' जाहीर; मोफत मोबाईल डेटा अन्...

Lok Sabha Elections 2024: समाजवादी पार्टीचे 'जनता का मांग पत्र' जाहीर; मोफत मोबाईल डेटा अन्...

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने आपला जाहीरनामा जारी केला असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. 'सपा'चे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षाने बुधवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी अखिलेश यांनी सांगितले की, आम्ही आमच्या या जाहीरनाम्याला 'जनता का मांग पत्र' हे नाव दिले आहे. यातील प्रमुख मागण्यांमध्ये संविधानाच्या रक्षणाचा अधिकार, लोकशाहीच्या रक्षणाचा अधिकार, माध्यमांच्या स्वातंत्र्याचा अधिकार आणि सामाजिक न्यायाचा अधिकार याचा समावेश आहे. 

तसेच जातीय जनगणनेशिवाय देशाचा विकास होणे अशक्य आहे. मोफत रेशनमध्ये गहूऐवजी पीठ देणार असल्याची घोषणा अखिलेश यांनी केली. याशिवाय प्रत्येक रेशनधारक कुटुंबाला महिन्याला ५०० रूपयांचा मोबाईल डेटा मोफत दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अखिलेश यादव यांनी आणखी सांगितले की, समाजवादी पार्टीच्या जाहीरनाम्यात तरूणांना पेपर लीकपासून मुक्त करणे, २०२५ पर्यंत जात जणगणना करणे आणि शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देणे या बाबी सामाविष्ट आहेत. यासोबतच मनरेगा कामगारांना ४५० रूपये देण्यात येणार आहेत. तसेच बहुतांश तरूण बेरोजगार आहेत. आजच्या घडीला बेरोजगारी ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात ९० टक्क्यांपर्यंत हा आकडा पोहोचला आहे. देशाच्या सीमेवर असुरक्षितता आहे. अग्निवीर योजना ही विचारपूर्वक केलेली एक रणनीती असून हे धोरण रद्द केले जाईल, असेही अखिलेश यांनी नमूद केले. 

उत्तर प्रदेशातील परस्थिती खराब आहे. भाजप सरकार आरक्षण देण्याच्या विरोधात असून, त्यामुळेच नोकऱ्या दिल्या जात नाहीत. सत्ताधाऱ्यांनी राज्यात जाणूनबुजून पेपर लीक केले. गरिबांपर्यंत पोहोचणारे रेशन कमी करण्यात आले. पौष्टिक आहार मिळत नाही, आम्ही जीडीपी तीन टक्क्यांहून सहा टक्के करू. सर्व विभागांमध्ये जुनी पेन्शन योजना देखील पूर्ववत केली जाईल. आम्ही मोफत रेशनमध्ये गव्हाऐवजी पीठ देऊ. त्यासाठी बाजारपेठांजवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पिठाचा कारखाना उभारण्यात येणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर लोकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. जनतेने पाठिंबा दिल्यास आम्हाला निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील, असे अखिलेश यादव यांनी आणखी सांगितले. 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Samajwadi Party President Akhilesh Yadav has released the manifesto for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.