पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:34 PM2024-05-14T14:34:59+5:302024-05-14T14:36:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावकांमध्ये आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांच्या नावांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते 2014 पासून येथून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचं दर्शनही घेतलं. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करतान्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू, संजय निषाद, ओम प्रकाश राजभर, आसामचे नेते प्रमोद बोरा, हरदीप सिंग पुरी आदी नेते मंडळी पोहोचले होते.
हे आहेत पंतप्रधान मोदींचे प्रस्तावक -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावकांमध्ये आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर यांच्या नावांचा समावेश आहे.
- आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड - यांनी श्रीराम मंदिरात रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढला होता आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य पुजारीही होते.
- बैजनाथ पटेल - जनसंघापासूनचे कार्यकर्ते आहेत.
- संजय सोनकर - संजय सोनकर हे वाराणसी भाजपचे जिल्हा महामंत्री आहेत.
26 नावांवर झाली होती चर्चा -
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ही चारही नावे निश्चित केली आहे. पक्षाने 26 जणांची निवड केली होती. यानंतर ही नावे पीएम मोदीकडे पाठवण्यात आली होती. यानंतर अमित शाह यांनी महमूरगंजमधील तुलसी उद्यान येथे असलेल्या मोदींच्या केंद्रीय निवडणूक कार्यालयात या नावांवर कोअर कमिटीसोबत चर्चा केली होती.
2019 मध्ये कोण होते प्रस्तावक -
विज्ञानी रमाशंकर पटेल
शिक्षाविद् प्रो. अन्नपूर्णा शुक्ला
डोमराजा जगदीश चौधरी
भाजपचे दुने कार्यकर्ते सुभाष गुप्ता
2014 मध्ये कोण होते प्रस्तावक -
महामना मदन मोहन मालवीय यांचे नातू गिरधर मालवीय
शास्त्रीय गायक पं. छन्नूलाल मिश्रा
नाविक भद्र प्रसाद निषाद
बुनकर अशोक कुमार