लखनौच्या एकना स्टेडियममध्ये मोठी दुर्घटना; वादळामुळे होर्डिंग कोसळून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:23 PM2023-06-05T20:23:47+5:302023-06-05T20:24:28+5:30
होर्डिंग एका स्कॉर्पियो गाडीवर कोसळले, त्या गाडीत तिघे बसले होते.
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. लखनौमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम 'एकना'मध्ये होर्डिंग कोसळलून दोघांचा मृत्यू झाला. जोरदार वादळामुळे हे होर्डिंग कोसळल्याची माहिती आहे. होर्डिंग एका स्कॉर्पिओ कारवर कोसळले, यावेळी गाडीत तीन जण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
Lucknow | Three people were injured after a board put up at Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium fell on a moving car today
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 5, 2023
All three persons including a man and two women have been shifted to a local hospital. The board fell due to strong winds: Police pic.twitter.com/4eIegdXAgy
पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून दोन महिलांसह तीन जखमींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दोघांचा मृत्यू झाला. स्टेडियमबाहेरील होर्डिंग पडल्याने काहीकाळ रस्त्याही ब्लॉक झाला. होर्डिंगला लावलेले मोठमोठे लोखंडी रॉड रस्त्यावर पडले.
होर्डिंग्जवर जाहिराती
दरम्यान, लखनौचे एकना स्टेडियम हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानेही ओळखले जाते. या स्टेडियममध्ये 2018 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. यानंतर अलीकडेच या स्टेडियममध्ये आयपीएलचे अनेक सामने खेळले गेले.