युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 06:27 PM2023-07-26T18:27:06+5:302023-07-26T18:27:37+5:30

तरुणीला विवस्त्र करुन व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

Manipur-like incident in Meerut, girl stripped and beaten after rape | युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

युपीच्या मेरठमध्ये मणिपूरसारखी घटना, अत्याचारानंतर तरुणीला विवस्त्र करुन मारहाण

googlenewsNext


मेरठ- अलीकडेच हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यात तरुणींवर अत्याचार करुन नग्न धिंड काढल्याची घटना घडली होती. त्या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. आता उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये तशाच प्रकारची घटना घडली आहे. आरोपीने आधी तरुणीवर बलात्कार केला, नंतर तिला विवस्त्र अवस्थेत उसाच्या शेतातून ओढत नेले. यावेळी तरुणी, कपडे घालू द्या, अशी विनवणी करत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी किठोरे गावात तरुणाने तरुणीला आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणाचे साथीदार तिथे आले आणि तरुणीचा व्हिडिओ बनवला. यावेळी आरोपींनी तिला मारहाण करत विवस्त्र केले आणि खेचत रस्त्यावर आणले. 

बहिणीच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवला
गेल्या रविवारी आरोपींनी तरुणीच्या बहिणीच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर तरुणची चौकशी केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. पीडितेच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि मुख्य आरोपी जाहिद आणि त्याचे दोन साथीदार पप्पू उर्फ ​​जावेद आणि आलम यांना अटक केली, तर व्हिडिओ बनवणारे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

तक्रीरीत काय म्हटले
एसपी ग्रामीण कमलेश बहादुर यांनी सांगितले की, तक्रारीत दोन वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने बलात्कार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात आरोपींविरोधात IPC 376(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक बलात्काराच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, ज्या चुकीच्या आहेत. 

 

Web Title: Manipur-like incident in Meerut, girl stripped and beaten after rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.