नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:12 PM2024-10-24T12:12:00+5:302024-10-24T14:33:43+5:30

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विषारी नागिणीमुळे या गावातील ग्रामस्थ दहशतीखाली जीव मुठीत धरून वावरत आहेत.

Nagin took murderous revenge, biting 5 people one after another, 3 people died   | नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील सरदपूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विषारी नागिणीमुळे या गावातील ग्रामस्थ दहशतीखाली जीव मुठीत धरून वावरत आहेत. संध्याकाळ होताच ही नागिण बिळातून बाहेर येते आणि ग्रामस्थांना आपली शिकार बनवते, असा दावा केला जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये या नागिणीने ५ जणांना दंश केला आहे. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जणांची प्रकती चिंताजनक आहे.  

सदरपूर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार या परिसरात एक नागिण बदला घेताना दिसत आहे. नुकतंच या नागिणीने एका खोलीत झोपलेल्या आई, मुलगा आणि मुलगीला दंश केला होता. त्यात या तिघांचाही मृत्यू झाला होता. दुसऱ्याच दिवशी या नागिणीने गावातील आणखी एक तरुण आणि महिलेला दंश  केला. बेशुद्धावस्थेत या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचेही प्राण वाचले.  

दरम्यान, या सापाच्या भीतीमुळे सदरपूर गावातील लोकांची झोप उडाली आहे. सध्या वन विभागाच्या पथकांकडून सापाला पकडण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. या दरम्यान, करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार  ग्रामस्थांना शिकार बनवत असलेल्या सापाला वनविभागाने पकडले आहे. आता हा साप किती विषारी आहे. त्याचं वय काय आहे, याची पडताळणी वनविभागाकडून करण्यात येत आहे. वनविभागाने हा सापा नागिण असल्याच्या दाव्यांना दुजोरा दिलेला नाही. मात्र ग्रामस्थ हा साप नागिण असल्याचा दावा करत आहेत.  

Web Title: Nagin took murderous revenge, biting 5 people one after another, 3 people died  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.