पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:46 PM2024-05-14T12:46:15+5:302024-05-14T12:49:31+5:30
Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination : पीएम मोदींच्या नामांकनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मागे बसलेले दिसले. तसेच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, एनडीएचे 12 मुख्यमंत्रीही मोदींचा उमेदवारी भरण्यासाठी आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते 2014 पासून सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. पीएम मोदींच्या नामांकनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मागे बसलेले दिसले. तसेच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, एनडीएचे 12 मुख्यमंत्रीही मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते.
Prime Minister Narendra Modi files nomination from Varanasi Lok Sabha seat for #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) May 14, 2024
Uttar Pradesh CM Yogi Adityanath is also present on the occasion. pic.twitter.com/S3JEAk3Okl
PM मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि काल भैरव यांचे दर्शन घेतले -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी, माता गंगेचे पूजन केले आणि काल भैरव यांचे दर्शन घेतले. मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करतान्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, एकनाथ शिंदे, चंद्राबाबू नायडू, संजय निषाद, ओम प्रकाश राजभर, आसामचे नेते प्रमोद बोरा, हरदीप सिंग पुरी आदी नेते पोहोचले होते.
Union Ministers, including Defence Minister Rajnath Singh and Home Minister Amit Shah, BJP national president JP Nadda, UP CM Yogi Adityanath, and other NDA leaders will be present during PM Modi's nomination filing for #LokSabhaElections2024
— ANI (@ANI) May 14, 2024
PM is the sitting MP and BJP's… pic.twitter.com/YFtR4UkC8Y
आईच्या आठवणीने भावूक झाले होते PM मोदी -
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले होते. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले, माता गंगेने मला दत्तक घेतले आहे. यापूर्वी, मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करत असत.