सबरीमालाच नाही, तर उत्तर प्रदेशमधील या मंदिरातही आहे महिलांना प्रवेशबंदी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:37 IST2024-12-05T13:36:53+5:302024-12-05T13:37:44+5:30
Jara Hatke News: आपल्या संपूर्ण देशभरात तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतात. यापैकी अनेक मंदिरं ही प्रसिद्ध आहे. तसेच प्रत्येक मंदिराचा काही इतिहास आणि प्रथा परंपरा असतात. काही मंदिरातील नियम पाहून लोकही अवाक् होतात.

सबरीमालाच नाही, तर उत्तर प्रदेशमधील या मंदिरातही आहे महिलांना प्रवेशबंदी, कारण काय?
आपल्या संपूर्ण देशभरात तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला मंदिरं पाहायला मिळतात. यापैकी अनेक मंदिरं ही प्रसिद्ध आहे. तसेच प्रत्येक मंदिराचा काही इतिहास आणि प्रथा परंपरा असतात. काही मंदिरातील नियम पाहून लोकही अवाक् होतात. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशमधील आहे. उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे असलेल्या या हनुमान मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. याबाबतचं कारण येथील पुजाऱ्यांनी सांगितलं आहे.
याबाबत माहिती देताना मंदिराचे पुजारी लल्लप्रसाद गिरी यांनी सांगितले की, हनुमान सदैव ब्रम्हचारी होते. त्यांच्यासाठी स्त्री ही आई आणि बहिणी समान आहे. भारतामध्ये मुलगी किंवा बहिणीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्यामुळे महिलांना हनुमानाच्या मंदिरात जाण्यास मनाई आहे. मात्र असं असलं तरी एखाद्या महिलेला या मंदिरात जायचं असेल तर ती जाऊ शकते.
सुल्तानपूरमधील मिठनेपूर ग्रामसभेमधील हे मंदिर आदि गंगा गोमतीच्या किनाऱ्यावर स्थित असल्याने मंदिराचं सौंदर्य अधिकच वाढलं आहे. हे मंदिर १२५ फूट उंच आहे. ज्यामध्ये ५.५ फूट हनुमंताची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मंदिरात दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात, अशी माहितीही पुजाऱ्यांनी दिली.