लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 11:33 AM2023-06-18T11:33:29+5:302023-06-18T11:34:23+5:30

आपण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे. 

On the first night of marriage, the wife was found to be a transgender family court nullified young man marriage | लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

लग्नाच्या पहिल्या रात्री समजलं पत्नी आहे 'किन्नर', कोर्टात पोहोचला पती अन् मग...

googlenewsNext

पती-पत्नीचे पटत नाही, म्हणून ते घटस्फोट घेतात अथवा विभक्त होतात, अशा अनेक घटना आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतील. पण पत्नी किन्नर असल्यामुळे पतीने घटस्फोट मागितल्याचे कधी ऐकले आहे का? तर असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आला आहे. 

संबंधित तरुणाला लग्नाच्या पहिल्याच रात्री समजले होते की, त्याची पत्नी पूर्णपणे स्त्री नाही. मात्र यानंतरही त्याने पत्नीवर बरेच उपचार केले, मात्र त्याचा फायदा झाला नाही. यानंतर संबंधित तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर, न्यायालयाने निकाल देत त्याचे लग्न रद्द केले. या तरुणाचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

7 वर्षांपूर्वी झाले होते लग्न -
गेल्या 7 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 जानेवारी 2016 रोजी एत्माद्दौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाचे लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या लक्षात आले की, त्याने ज्या तरुणीसोबत लग्न केले आहे, ती पूर्णपणे स्त्री नाही. तिचे प्रायव्हेट पार्ट्स बिलकूलच विकसित झालेले नाहीत. यानंतर सुरुवातीला संबंधित तरुण प्रचंड अस्वस्थ झाला. यानंतर त्याने डॉक्टरांशी संपर्क साधून पत्नीवर उपचारही केले. अनेक महिने उपचार करूनही फायदा होत नव्हता. दरम्यान, त्याची पत्नी कधीही आई होऊ शकणार नाही, असेही संबंधित डॉक्टरांनी तरुणाला सांगितले होते.

न्यायालयाने लग्न रद्द ठरवले -
पीडित तरुनाने दिलेल्या माहितीनुसार, बदनामीमुळे त्याने हा प्रकार कुणालाही सांगिली नव्हती. यानंतर काही दिवसांनी वकील अरुण शर्मा यांच्या करवी कुटुंब न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. तब्बल 7 वर्षे हा खटना सुरू होता. यानंतर, आता यावर निर्णय आला आहे. पुराव्यांच्या आधारे कुटुंब न्यायालयाने घटस्फोटासाठी परवानगी दिली आहे. न्यायालयाने विवाह रद्द ठरवत घटस्फोटाचा आदेश दिल आहे.

Web Title: On the first night of marriage, the wife was found to be a transgender family court nullified young man marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.