एक पत्नी, दोन दावेदार..., सहा तास रंगला ड्रामा, प्रकरण ऐकून पोलीसही अवाक्, अखेर असा झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 03:50 PM2023-06-18T15:50:11+5:302023-06-18T15:50:33+5:30
Husband Wife News: एक अजब घटना समोर आली आहे. पोलिसांसमोर एका तरुणीवर दोन तरुणांनी दावा केला. याच परिसरात राहणाऱ्या पिंकीवरून दोन तरुण पोलीस ठाण्यातच आमने-सामने आले.
उत्तर प्रदेशमधील झाशी येथील रानीपूर चौकी येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथील ठाण्यातील पोलिसांसमोर एका तरुणीवर दोन तरुणांनी दावा केला. याच परिसरात राहणाऱ्या पिंकीवरून दोन तरुण पोलीस ठाण्यातच आमने-सामने आले. जालौन येथील रहिवासी असलेल्या तरुणाने पिंकी नावाच्या तरुणीवर आृदावा करताना झाशी येथे एका सामुहिक विवाह सोहळ्यात आपला विवाह झाल्याचे सांगितले. तर पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या मउरानीपूर येथील अन्य तरुणानेही पिंकी ही आपली पत्नी असल्याचा दावा केला. पिंकीसोबत आपलं कोर्ट मॅरेज झाल्याचे त्याने सांगितले. एका तरुणीवर दोघांनी दावा केल्याने पोलीसही अवाक् झाले.
सुमारे सहा तास पिंकीसाठी तिचे तथाकथित दोन्ही पती पोलीस ठाण्यात वाद घालत होते. रानीपूर पोलीस ठाण्याचे इन्चार्जसुद्धा पिंकी नेमकी कुणाची पत्नी आहे याबाबचा निर्णय घेऊ शकले नाहीत. वाद वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी पिंकीला तात्पुरते तिच्या दुसऱ्या पतीसोबत पाठवून दिले. तर पहिल्या पतीने रानीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर पिंकीने सांगितले की, तिचा पहिला पती तिला दारूच्या नशेत मारहाण करत असे. एक वर्षभर पतीचा जाच सहन केला. मात्र नंतर त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या एका तरुणासोबत कोर्ट मॅरेज केलं. मी सज्ञान असून, आता मला दुसऱ्या पतीसोबतच राहायचं आहे. पिंकीचा जबाब ऐकून पोलिसांनी तिला तिच्या दुसऱ्या पत्नीसोबत पाठवून दिलं. तर पहिल्या पतीला तपास करून कारवाई कऱण्याचं आश्वासन देत त्याची रवानगी तुरुंगात केली.