ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:57 AM2023-08-03T10:57:10+5:302023-08-03T10:57:58+5:30

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे.

Paving way for ASI survey of Gyanvapi; An important decision of the allahabad High Court came today | ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचा मार्ग मोकळा; हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आला

googlenewsNext

अयोध्येनंतर उत्तर प्रदेशमध्ये ज्ञानवापी मशीदीच्या परिसराने देशभराचे लक्ष वेधले आहे. ज्ञानवापी परिसराच्या एएसआय सर्व्हेवर अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आला आहे. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेक्षणाला मंजुरी दिली आहे. एएसआय सर्व्हेक्षणाला हायकोर्टानेच स्थगिती दिली होती. 

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला हाय कोर्टाने कायम ठेवले आहे. यामुळे एएसआयवर लावण्यात आलेली बंधने देखील हटली आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर एएसआयने २४ जुलैपासून सर्व्हेक्षणाला सुरवात केली होती. यामुळे मशीद कमिटी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण तात्काळ थांबवताना २६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल देण्याचे आदेश हायकोर्टाला दिले होते. त्यावर सुनावणी होऊन हायकोर्टाने २७ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. हायकोर्टाने 3 ऑगस्ट रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. आज हा निर्णय आला आहे. यामुळे आजपासूनच सर्व्हेक्षण सुरु होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून 4 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने विलंब झाला आहे. ज्ञानवापी कॅम्पसच्या ASI सर्वेक्षणाबाबत वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेश यांच्या न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणासंबंधीचा स्टेटस रिपोर्ट एएसआय न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे. यानंतर त्यांना पुढील मुदत दिली जाणार आहे. 

Web Title: Paving way for ASI survey of Gyanvapi; An important decision of the allahabad High Court came today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.