पेट्रोलचे इंजेक्शन दिले, अन् लघवीही पाजली...; यूपीत दोन मुलांवर तालिबानी अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:27 AM2023-08-07T05:27:43+5:302023-08-07T05:27:53+5:30

पाथरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास सुरू आहे.

Petrol injected, and urinated on...; Taliban torture two children in UP | पेट्रोलचे इंजेक्शन दिले, अन् लघवीही पाजली...; यूपीत दोन मुलांवर तालिबानी अत्याचार

पेट्रोलचे इंजेक्शन दिले, अन् लघवीही पाजली...; यूपीत दोन मुलांवर तालिबानी अत्याचार

googlenewsNext

सिद्धार्थनगर : दोन हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप करत दोन अल्पवयीन मुलांचे हात बांधले, त्यानंतर त्यांच्या गुदद्वारात मिरची पावडर टाकून त्यांना पेट्रोलचे इंजेक्शन देत त्यांना लघवी पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी पाथरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, पुढील तपास सुरू आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) सिद्धार्थ यांनी सांगितले की, घटनेशी संबंधित सहा आरोपींना पोलिस कोठडीत टाकण्यात आले असून, गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. 

पोलिसांनी सांगितले की, ही घटना पाथरा बाजारच्या कोनकटी क्रॉसिंगवर शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली, ज्याचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक अभिषेक कुमार अग्रवाल यांनी त्याची दखल घेत कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथरा बाजार येथील कोनकटी चौकात अरशान चिकन शॉप असून, तेथे १० व १५ वर्षे वयोगटांतील दोन अल्पवयीन मुलांवर दोन हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोपानंतर दोघांचेही दोन्ही हात बांधले होते. आरोपींनी दोन्ही मुलांना पेट्रोलचे इंजेक्शन दिले, त्यांच्या  गुदद्वारात मिरची पावडर टाकली आणि त्यांना लघवी पिण्यास करण्यास 
भाग पाडले गेले.

लोक बघत राहिले...
n घटनेवेळी अनेक लोक उपस्थित होते. मात्र दोन्ही मुलांना वाचविण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही आणि ते संवेदनहीन होत घटना पाहत राहिले. 
n आरोपीने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पोलिस अधीक्षकांनी व्हिडीओची दखल घेतल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले व चौकशीनंतर सहा जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Petrol injected, and urinated on...; Taliban torture two children in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.