नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 06:02 PM2023-06-12T18:02:15+5:302023-06-12T18:02:48+5:30

Ram Mandir : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

pm modi to perform pran prathistha of ram lalla ayodhya ram mandir | नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार रामललाची प्राणप्रतिष्ठा; जाणून घ्या, राम मंदिराचे उद्घाटन कधी?

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. वेळोवेळी राम मंदिराचे फोटोही समोर येत आहेत. दरम्यान, जानेवारी 2024 पर्यंत राम मंदिराचा तळमजला तयार होईल आणि 2024 मध्ये मकर संक्रांतीनंतर राम मंदिराचे उद्घाटन होईल. तसेच, रामललाची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा केली जाईल. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठवणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 14 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिराचे उद्घाटन होऊ शकते. त्यामुळे अनेक वर्षांची भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे.दुसरीकडे, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललाच्या दोन अतिरिक्त मूर्ती मंदिर परिसरातच चांगल्या ठिकाणी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांचे पावित्र्य अबाधित राहील. अयोध्येत कोरलेल्या रामललाच्या तीन मूर्तींपैकी केवळ सर्वोत्तम मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात येणार आहे. 

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट रामललाच्या उर्वरित दोन मूर्ती स्थापित करण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी विविध पुजाऱ्यांचा सल्ला घेत आहे. ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की, रामललाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराबाहेर पाठवल्या जाणार नाहीत. त्या मंदिर परिसरात चांगल्या ठिकाणी पूर्ण सन्मानाने स्थापित केल्या जातील. ट्रस्टच्या सदस्याच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी एक मूर्ती स्थापित केली जाऊ शकते. राम मंदिराचा पहिला आणि दुसरा मजलाही तितकाच भव्य असेल. रामललाच्या उर्वरित दोन मूर्तींसाठी ते योग्य ठिकाण असू शकते, असे सदस्य म्हणाले.

अयोध्येचा बदलणारा चेहरा
याशिवाय, अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबरोबरच अयोध्येत संपूर्ण कायापालट करण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. एकीकडे जुन्या अयोध्येच्या नूतनीकरणासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असताना दुसरीकडे अयोध्येत घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापन आणि बहुस्तरीय पार्किंगवरही काम सुरू आहे. एवढ्या जुन्या शहराच्या पुनर्बांधणीची योजना अयोध्या कधीच राबवली गेली नाही. मात्र अयोध्येचे चित्र बदलण्याची कसरत राम मंदिर उभारणीच्या आदेशानंतरच सुरू झाली आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा पूर्ण भर आहे.
 

Web Title: pm modi to perform pran prathistha of ram lalla ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.