आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:06 PM2024-05-14T12:06:47+5:302024-05-14T12:12:50+5:30

PM Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination : गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले माता गंगेने मला दत्तक घेतले आहे.

PM Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination modi says After my mother's death ganga is my mother Modi got emotional before filing his nomination in Varanasi | आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी

आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी

वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांचे 30 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले आहे. आईच्या  निधनानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच निवडणूक आहे. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखती मोदी म्हणाले, 400 पार ही देशाची भावना आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच, माझ्या आईच्या निधनानंतर, गंगा हीच माझी आई आहे आणि मला 'गंगा मय्या'ने दत्तक घेतले आहे, असेही मोदी म्हणाले.

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले माता गंगेने मला दत्तक घेतले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले. यापूर्वी, मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊनच उमेदवारी अर्ज दाखल करत असत. मात्र यावेळी त्यांची आई नाही.

राहुल गांधींवर निशाणा -
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "केरळने त्यांना ओळखले आहे, केरळने त्यांना पळवून लावले आहे. वायनाडमधून पळून ते आता रायबरेलीत पोहोचले आहेत. केरळमधून पळवून लावल्यानंतर, त्यांची भाषा बदलली आहे." राहुल गांधी यावेळी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर एकाचवेळी निशाणा साधला. हे दोघे यापूर्वीही सोबत आले होते. यूपीच्या जनतेने या दोघांनाही ओळखले आहे. ते एकत्र आल्याने भाजपला काही फरक पडणार नाही.

Web Title: PM Narendra modi varanasi lok sabha election 2024 nomination modi says After my mother's death ganga is my mother Modi got emotional before filing his nomination in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.