राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 09:29 PM2024-04-30T21:29:23+5:302024-04-30T21:36:39+5:30
अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बुधवारी (1 मे) अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यानुसार, अयोध्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती मुर्मू राम मंदिरात रामललांचे दर्शन करतील. याच बरोबर, त्या हनुमानगढी मंदिरात दर्शन आणि आरतीही करतील.
याशिवाय, राष्ट्रपती मुर्मू कुबेर टीला येथेही जातील. तसेच, शरयू नदीची पूजा आणि आरतीही करतील. अयोध्येत भव्य राम मदिर उभे राहिल्यानंतर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच अयोध्या दोऱ्यावर येत आहेत. 22 जानेवरी 2024 रोजी राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर भाविक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत.
राम मंदिर ट्रस्टकडून तयारी सुरू -
आयएएनएसच्या वृत्तानुसार, राम मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भातील तयारी संदर्भात भाष्य केले आहे. या दरम्यान सामान्य भाविकांनाही रोजच्या प्रमाणेच रामललांचे दर्शन आणि पूजन करता येईल, असे राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने एक मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर, त्यांना व्हीआयपी गेटने मंदिर परिसरापर्यंत आणले जाईल. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राष्ट्रपति जवळपास तीन तास शरहात असतील. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.