अयोध्येतील राम मंदिरानं मक्का अन् व्हॅटिकनलाही टाकलं मागे...! 48 दिवसांत एवढे लोक दर्शनासाठी पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:27 PM2024-04-03T16:27:11+5:302024-04-03T16:27:33+5:30
आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत.
प्रभू रामलला भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाल्यानंतर, अयोध्येला पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होताना दिसत आहे. देश आणि जग भरातील राम भक्त प्रभू रामललांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. राम मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, रोज दीड ते दोन लाख लोक रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. सुट्टीच्या दिवसात तर हा आकडा आणखी वाढतो. याशिवाय, सनांच्या दिवशीही मंदिरात मोठी गर्दी दिसून येते. राम मंदिरासोबतच रामनगरी अयोध्याही जगाच्या नकाशावर उठून दिसत आहे.
आता रामनगरी अयोध्या एक धार्मिक राजधानी म्हणून उदयाला येत आहे. गेल्या 22 जानेवारीला रामलला राम मंदिरात विराजमान झाले. तेव्हापासून लाखो भाविक रामललांच्या दर्शनासाठी आयोध्येत दाखल होत आहेत. गेल्या 2 महिन्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तब्बल एक कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक कुठल्याही धार्मिक स्थळी पोहोचलेले नाहीत.
ख्रिश्चन समाजाचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणजे, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकनला दरवर्षी सुमारे 90 लाख लोक भेट देतात. तसेच मुस्लीम समाजाचे सर्वात मोठे पवित्रस्थळ म्हणजे मक्का. येथे गेल्या वर्षात 13.5 कोटी लोकांनी भेट दिली. राम मंदिरासंदर्भात बोलायचे झाल्यास, येथे रोज लाखो भाविक येत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे.
सव्वा कोटी भाविकांनी घेतलं दर्शन ट्रस्टचा दावा -
राम मंदिर ट्रस्टचे कँप कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला आहे की, सरकारी आकडेवारीनुसार जवळपास एक कोटी 25 लाखहून अधिक राम भक्तांनी रामलला ललांचे दर्शन केले आहे. पूर्वी भारत विश्व गुरू होता. त्याची राजधानी अयोध्या होती. काहीसे असेच पुन्हा एकदा होत आहे. हिंदू समाजाच्या दृष्टीने ही फारच चांगली गोष्ट आहे. एवढेच नाही, त भारतासाठी याहून चांगली गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही, असेही प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे.
गुप्ता म्हणाले, मक्का मदीनेत केवळ हजच्या वेळीच लोक जातात. तसेच, ख्रिश्चन धार्मिक स्थळालाही विशिष्ट काळातच लोक भेट देतात. अयोध्येत रोज जवळपास 2 लाख लोक येत आहेत. राम जन्मोत्सवादरम्यान ही संख्या 5 ते 10 लाख पर्यंत जाईल, असा अंदाज आहे.