सचिन-विराट ते अंबानी...; रामललांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी 7000 जणांना आमंत्रण, होणार भव्य कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 02:10 AM2023-12-07T02:10:46+5:302023-12-07T02:12:25+5:30
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 जानेवारी, 2024 रोजी होणाऱ्या या प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी आधीच आमंत्रण देण्यात आले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 जानेवारी, 2024 रोजी होणाऱ्या या प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी आधीच आमंत्रण देण्यात आले आहे. ट्रस्टने 3000 व्हीव्हीआयपींसह 7,000 जणांना आनंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अधाणी यांचा समावेश आहे.
अयोध्येत रामललांच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त, सर्व जिल्ह्यांतील प्रसिद्ध मंदिरांमध्ये 14 जानेवारीपासून (मकर संक्रांती) ते 22 जानेवारीला रामललांच्या प्राण प्रतिष्ठेपर्यंत रामायण, रामचरितमानस आणि हनुमान चालिसाचे अखंड पठण व्हावे. यासाठी पर्यटन विभाग खर्चाची व्यवस्था करेल. असा योगी सरकारचा प्लॅन आहे.
अयोध्येत सध्या 30 हजार 500 कोटी रुपयांच्या 178 विकास प्रकल्पांवर काम सुरू आहे. यात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढला, तर येणाऱ्या काळात येथे 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प साकारताना दिसतील. यामुळे लाखोंच्या संख्येने रोजगार निर्मितीही होईल.