चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा ही आम्हीच मागणी केली होती - अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 02:16 PM2024-02-09T14:16:18+5:302024-02-09T14:18:47+5:30

चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

Samajwadi Party President and former Uttar Pradesh Chief Minister Akhilesh Yadav said We had demanded Bharat Ratna for Chaudhary Charan Singh a few days ago  | चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा ही आम्हीच मागणी केली होती - अखिलेश यादव

चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा ही आम्हीच मागणी केली होती - अखिलेश यादव

Akhilesh Yadav: देशाच्या आणि विशेषत: उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठा चेहरा राहिलेल्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आम्ही यासाठी मागणी केली होती असे म्हटले आहे. 

देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, इथे लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. चौधरी चरणसिंह हे उत्तर प्रदेशचे भूमिपुत्र असून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आपल्या राजकीय जीवनात प्रथम आमदार बनून त्यांनी संसदीय कामाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी देशासाठी काम केले. आणीबाणीच्या काळात सरकारविरुद्ध त्यांनी उघडपणे भूमिका घेत आणीबाणीला विरोध केला होता. आणीबाणीच्या काळात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केल्याचे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार जाहीर करताना म्हटले आहे. 


 
चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले की, खूप खूप अभिनंदन... चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी समाजवादी पार्टीने केली होती. आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याशी चर्चा झाली का, या प्रश्नावर ते म्हणाले की, येथे कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या सर्व केवळ वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले, "देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधात देखील ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले प्रेम आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

Web Title: Samajwadi Party President and former Uttar Pradesh Chief Minister Akhilesh Yadav said We had demanded Bharat Ratna for Chaudhary Charan Singh a few days ago 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.