धक्कादायक ! गंगास्नानाच्या अंधश्रद्धेतून ५ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:39 PM2024-01-25T13:39:54+5:302024-01-25T13:41:25+5:30
घटनेची माहिती मिळताच हरिद्वार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह असून अयोध्येत भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे. एकीकडे भाविकांच्या श्रद्धेचा उत्सव पाहायला मिळत आहे. मात्र, हरिद्वार येथे अंधश्रद्धेतून एका चिमुकल्याला जीव गमावावा लागला आहे. तंत्र-मंत्राच्या चक्करमध्ये कुटुंबातील सदस्यांकडूनच लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हरीद्वारच्या हरकी पौंडी येथे तंत्र-मंत्रच्या चक्करमध्ये ५ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे अंधश्रद्धेतून कुटुंबातील सदस्यांनीच त्याला पाण्यात बुडवले होते.
घटनेची माहिती मिळताच हरिद्वारपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यावेळी, संबंधित चिमकुल्यास रक्ताचा कर्करोग असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कुटुंबीयांनी अंधश्रद्धेतून हा कर्करोग बरा करण्यासाठी बालकाच येथील पाण्यात बुडवले होते. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला आहे.
संबंधित बालकाला रक्ताचा कर्करोग असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टरांनी आजाराबद्दल माहिती दिल्यानंतर, मुलाच्या मावशीने गंगास्ना करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मुलाच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबीय हरिद्वार येथे गंगास्नान करण्यासाटी चिमुकल्यास घेऊन आले होते. त्यावेळी, अत्यवस्थ अवस्थेतील बालकाला गंगास्नान करण्यात येत असल्याचं पाहून भाविकांनी गोंधळ केला. तसेच, कुटुंबीयांनीच त्या बालकाला पाण्यात बुडवून ठार मारल्याचा आरोपही येथील भाविकांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृत बालकाचे शवविच्छेदन केल्यानतंर पोलिसांनी मुलाचे आई-वडिल आणि मावशीची चौकशी केली. त्यानंतर, रात्री उशिरा कुटुंबीय मृतदेह घेऊन दिल्लीकडे रवाना झाले होते. दिल्लीच्या सोनिया विहार कॉलनीत रहिवाशी राजकुमार सैनी यांच्या मुलासोबत ही दुर्घटना घडली. या मुलाची मावशी धार्मिक असून त्यांच्या सांगण्यावरुन कुटुंबीयांनी हरिद्वारला गंगास्नान करण्यासाठी बालकास आणले होते.