‘रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद’, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयाेध्येत सुरू केली स्वच्छता माेहिम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 06:50 AM2024-01-15T06:50:01+5:302024-01-15T06:50:19+5:30

- त्रियुग नारायण तिवारी अयाेध्या : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयाेध्येत स्वच्छता माेहीम सुरू करण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्री याेगी ...

'Shri Ram will bless for the establishment of Ram Rajya', Chief Minister Adityanath started cleanliness campaign in Ayaedhi | ‘रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद’, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयाेध्येत सुरू केली स्वच्छता माेहिम

‘रामराज्य स्थापनेसाठी श्रीराम देतील आशीर्वाद’, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अयाेध्येत सुरू केली स्वच्छता माेहिम

- त्रियुग नारायण तिवारी

अयाेध्या : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयाेध्येत स्वच्छता माेहीम सुरू करण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी लता मंगेशकर चाैकात स्वच्छता केली आणि या माेहिमेत सर्वांना सहभागी करुन घेण्यात आले. २०१४ मध्ये रामराज्य स्थापनेचे कार्य सुरू झाले. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी स्वत: प्रभू श्रीराम आशीर्वाद देतील, असा विश्वास याेगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केला.

याेगी आदित्यनाथ अयाेध्येतील महर्षी वाल्मीकी विमानतळावर उतरले आणि थेट लता मंगेशकर चाैकात पाेहाेचले. त्यांनी हातात झाडू घेतला आणि परिसर स्वच्छ केला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या स्वच्छता वाहनांना हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाेबत चर्चा केली.

इलेक्ट्रिक बससेवेचा याेगींच्या हस्ते शुभारंभ
अयाेध्येमध्ये चांगली सार्वजनिक परिवहन सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याेगी आदित्यनाथ यांनी अयाेध्याधाम बसस्थानकातून इलेक्ट्रिक बसचे लाेकार्पण केले. अयाेध्येत दाखल हाेणारे भाविक आणि पर्यटकांना चांगली परिवहन सुविधा उपलब्ध व्हावी, असे ते म्हणाले. 

अभूतपूर्व उत्सव व्हावा
याेगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले, की ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अभूतपूर्व क्षण येत आहे. हा अभूतपूर्व उत्सव आहे. त्यासाठी प्रत्येक गाव, प्रत्येक घरापर्यंत त्याचप्रकारे तयारी व्हायला हवी. प्रत्येक घर, मंदिरावर दीपाेत्सव साजरा झाला पाहिजे, असे प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: 'Shri Ram will bless for the establishment of Ram Rajya', Chief Minister Adityanath started cleanliness campaign in Ayaedhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.