"साहेब! माझी बायको ISISच्या संपर्कात, तिची ATS चौकशी करा"; नवऱ्याच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:56 IST2023-07-28T13:50:15+5:302023-07-28T13:56:18+5:30
एका पतीने आपल्या पत्नीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने एसएसपीला अर्ज देऊन सांगितले की, माझी पत्नी ISIS च्या संपर्कात असल्याचा मला संशय आहे.

फोटो - news18 hindi
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने एसएसपीला अर्ज देऊन सांगितले की, माझी पत्नी ISIS च्या संपर्कात असल्याचा मला संशय आहे, तिची एटीएस चौकशी करा. ती अनेक महागडे फोन वापरते असेही पतीने सांगितले. यासोबतच वेगवेगळ्या नावांसह ओळखपत्रही उपलब्ध आहेत.
माहिती देताना अलीगडच्या क्वारसी पोलीस स्टेशन परिसरातील नगला पटवारीचा रहिवासी सिराज अली म्हणाला की, "माझी २ वर्षांपूर्वी फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली होती. मुलीने सांगितले की, मी अनाथ, असहाय्य आहे, त्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांशी नियमित बोलू लागलो. हळूहळू आमच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मुलीला विश्वासात घेऊन मी तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर मी त्या मुलीला वधू म्हणून माझ्या घरी आणले. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले, पण काही दिवसांनी माझी पत्नी महागडे फोन वापरू लागली. तिच्याकडे अनेक ओळखपत्रेही आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर मला ते संशयास्पद वाटलं."
सिराज अलीने सांगितले की, "एकदा मी आजारी होतो आणि माझ्या आजारपणात ती मला नोएडाला घेऊन गेली, तेव्हा मला तिच्या खात्यात 21 लाख रुपये दिसले. ती अनाथ आहे या विचाराने मी अस्वस्थ झालो, मग इतके पैसे कुठून आले, त्यानंतर मी तिला खूप दिवसांपासून पाहत आहे, ती अनेक फोन वापरते, ती दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा मला संशय आहे."
"ती देशासाठी धोकाही असू शकते, मला वाटतं ती ISIS ची एजंटही असू शकतो. 2 वर्षांपूर्वी जेव्हा मी तिच्याशी लग्न केले तेव्हा तिने तिचे नाव हसिना असे सांगितले, परंतु तिच्याकडे पुजा, हसिना, मनीषा या नावांसह ओळखपत्रांसह अनेक ओळखपत्रे आहेत. मला भीती वाटते की ती देशासाठी काही मोठा गुन्हा करेल, आज मी एसएससीला तक्रार घेऊन आलो आहे, मी सरांना भेटलो आहे, सरांनी मला आश्वासन दिले आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.