एक्झिट पोलद्वारे भाजपला शेअर बाजारात नफा मिळवायचाय, सपा नेते अखिलेश यादव यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:21 AM2024-06-03T07:21:14+5:302024-06-03T07:21:32+5:30

सतर्क राहून मतमोजणीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन

SP leader Akhilesh Yadav alleges that BJP wants to make profit in the stock market through exit polls | एक्झिट पोलद्वारे भाजपला शेअर बाजारात नफा मिळवायचाय, सपा नेते अखिलेश यादव यांचा आरोप

एक्झिट पोलद्वारे भाजपला शेअर बाजारात नफा मिळवायचाय, सपा नेते अखिलेश यादव यांचा आरोप

लखनौ : भाजपधार्जिनी माध्यमे भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा दाखवतील, यामुळे फसवणुकीला वाव मिळेल, असे विरोधकांनी आधीच जाहीर केले होते. भाजपचा एक्झिट पोल अनेक महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, तो सध्या वाहिन्यांनी चालविला होता. या एक्झिट पोलद्वारे जनमताची फसवणूक केली जात आहे, असा आरोप सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. ⁠या एक्झिट पोलच्या आधारे, भाजपला सोमवारी शेअर बाजार उघडल्यानंतर तत्काळ नफा मिळवायचा आहे. जर हे एक्झिट पोल खोटे नसते आणि भाजपचा खरोखर पराभव होत नसता तर भाजपच्या लोकांनी आपल्याच लोकांना दोष दिला नसता. भाजपचे कोमेजलेले चेहरे संपूर्ण सत्य सांगत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

एक टक्काही चूक करू नका
इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारांनी ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यात एक टक्काही चूक करू नये. इंडिया आघाडी जिंकत आहे. त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी खूप सतर्क राहावे लागणार आहे. मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्यावरच विजयाचा गुलाल उधळा, असे आवाहन अखिलेश यांनी केले आहे.

न्यायालयामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हेराफेरीचे धाडस होईना
अखिलेश म्हणाले की, चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीप्रमाणे संपूर्ण देशाचा निकाल बदलता येणार नाही हे भाजपला समजत आहे. यावेळी विरोधक पूर्णपणे सतर्क आहेत आणि जनक्षोभही शिगेला पोहोचला आहे. भाजपशी संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची कारवाई पाहून हेराफेरी करण्याचे धाडसही होत नाहीये. जनतेच्या रोषाला बळी पडण्याची त्यांची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: SP leader Akhilesh Yadav alleges that BJP wants to make profit in the stock market through exit polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.