PM मोदींसोबत सेल्फी घेणारी स्वाती झाली व्हायरल; चपळाई अन् चतुराईनं मिळवला 'लाइफ टाइम' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 09:44 AM2024-01-01T09:44:04+5:302024-01-01T09:55:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतल्यानं स्वातीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Swati's selfie with Prime Minister Narendra Modi during Ayodhya tour went viral | PM मोदींसोबत सेल्फी घेणारी स्वाती झाली व्हायरल; चपळाई अन् चतुराईनं मिळवला 'लाइफ टाइम' फोटो

PM मोदींसोबत सेल्फी घेणारी स्वाती झाली व्हायरल; चपळाई अन् चतुराईनं मिळवला 'लाइफ टाइम' फोटो

अयोध्या - उत्तर प्रदेशातील अयोध्येत प्रभू राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच अयोध्येत होणाऱ्या विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यावेळी मोदींनी अचानक उज्ज्वला योजनेतील लाभार्थी कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीत मोदी मीरा मांझी यांच्या घरी पोहचले आणि त्यांच्यासोबत चहाचा आस्वाद घेत योजनेच्या फायद्यामुळे झालेल्या लाभाबाबत जाणून घेतले. यावेळी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती. त्यात मोदींसोबत सेल्फी घेतलेल्या स्वातीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतल्यानं स्वातीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळी साडे दहा वाजले होते. अयोध्येतील एका गल्लीत पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला जात होता. लोकांना काही कळायच्या आत मोदी मीरा मांझी यांच्या घरी येणार असल्याचे समोर आले. आपल्या गल्लीत देशाचे पंतप्रधान येणार म्हटल्यावर लोकांसह लहान मुलांचाही मोठी गर्दी झाली. मीरा मांझी यांच्या घराबाहेर लोक मोठ्या प्रमाणात जमले. त्यात पंतप्रधान मोदी आले. या गर्दीत हातात चित्र घेऊन उभा असलेला अनुज याच्यावर पंतप्रधानांची नजर पडली. पंतप्रधानांनी अनुजला विचारले हे चित्र काय आहे, त्यावर अनुजने राम मंदिरचे आहे. त्यावर मोदींनी किती वेळ लागला तर अनुजने ३ तास असं उत्तर दिले. मोदींनी अनुजच्या चित्रकलेचे कौतुक केले तर अनुजनेही मोदींनी त्यांचा ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. 

तेवढ्यात अनुजची बहिण स्वाती पेन घेऊन धावत आली. मोदींनी ऑटोग्राफ दिला. त्यानंतर स्वातीने मोदींसोबत सेल्फी घेण्यााचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा जवानांनी तिला अडवले. त्यावर मोदींनी सुरक्षा जवानांना सूचना देत तिला सेल्फी काढू द्या असं म्हटलं. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि अनेकांनी त्याला लाईक्स केले. पंतप्रधान मोदी यांना बऱ्याचदा लहान मुलांमध्ये वावरताना, त्यांच्यासोबत मज्जामस्ती करताना पाहण्यात आले आहे. लहान मुलांबद्दल पंतप्रधानांना असलेले प्रेम नेहमी दिसून आले आहे. स्वातीसोबत पंतप्रधानांनी सेल्फी घेतल्यानंतर परिसरात स्वातीची बरीच चर्चा होत आहे. मित्र-नातेवाईक यांनी फोन करून स्वातीचं कौतुक केले. तुला सुरक्षा रक्षकांनी अडवलं नाही का..? असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे. त्यावर सुरक्षा रक्षकांना बाजूला होण्यास सांगत पंतप्रधानांनी मला सेल्फी घेण्याची परवानगी दिली असं स्वाती सांगते.

Web Title: Swati's selfie with Prime Minister Narendra Modi during Ayodhya tour went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.