अयोध्येत भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’; सोहळ्याची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:42 AM2023-11-22T05:42:37+5:302023-11-22T05:43:15+5:30
२२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत पूर्वतयारी
अयोध्या : अयोध्या येथील रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या राममंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ‘टेन्ट सिटी’ वसविली जात आहे. तेथील तंबूंमध्ये सुमारे ८० हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल.
गुप्तार घाट येथे २० एकर परिसरात टेन्ट सिटी उभारली जाणार असून तिथे २० ते २५ हजार भाविकांच्या निवासाची सोय होईल. अयोध्या धाम येथील ब्रह्मकुंड परिसरातही एक टेन्ट सिटी स्थापन करण्यात येणार आहे. तिथे ३० हजार भाविकांना निवासाची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे बाग बिगेसी भागात २५ एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या तंबूंमध्ये २५ हजार लोक राहू शकतील. त्याशिवाय कारसेवकपुरम, मणिरामदास छावणी भागात देखील भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिराच्या दरवाजांवर सोन्याची कलाकुसर
nअयोध्येच्या राममंदिरातील तळमजल्याच्या अठरा दरवाजांवर सोन्याची कलाकुसर केली जाणार आहे. या मंदिरातील तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे.
n२२ जानेेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होईल. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे.