स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची भीषण धडक; 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 03:24 PM2023-10-30T15:24:14+5:302023-10-30T15:24:26+5:30

युपीच्या बदायूमध्ये हा भीषण अपघात झाला. जखमींपैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Terrible collision between school van and college bus; 4 including 3 students died on the spot, 16 injured | स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची भीषण धडक; 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची भीषण धडक; 3 विद्यार्थ्यांसह चौघांचा जागीच मृत्यू, 16 जखमी

UP Accident: उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आज(दि.30) भीषण अपघात झाला. स्कूल व्हॅन आणि कॉलेज बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन मुलांसह व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर 16 मुले गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

उसावन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीगंज गावात हा अपघात झाला. मायूनच्या एसआरपीएस शाळेची व्हॅन आणि सत्यदेव इंटर कॉलेजची बस सकाळीच परिसरातील विविध गावात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जातात. दोन्ही वाहने विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे येत असताना नवीगंजजवळ त्यांची समोरासमोर धडक झाली. ही घटना सोमवारी सकाळी 8.44 वाजता घडली.

अधिकारी घटनास्थळी पोहोचले
जखमींमधील सात ते आठ मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच दातागंजचे एसडीएमही घटनास्थळी पोहोचले. एसडीएमने स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, डीएम मनोज कुमार आणि एसएसपी डॉ. ओपी सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात पोहोचून जखमी विद्यार्थ्यांना चांगल्या उपचारांची ग्वाही दिली. 

Web Title: Terrible collision between school van and college bus; 4 including 3 students died on the spot, 16 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.