मोबाईलसाठी तरुणीला ऑटोमधून खेचणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा! उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत केला एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:25 AM2023-10-30T10:25:07+5:302023-10-30T10:25:46+5:30
गाझियाबादमध्ये मोबाईल फोन चोरण्यासाठी बीटेकच्या विद्यार्थीनीला ऑटोमध्ये खेचणारा दुसरा आरोपी जीतू याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एक विद्यार्थीला रिक्षातून खेचून ओढल्याचे प्रकरण समोर आले होते. या तरुणीला मोबाईलसाठी खेचल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणातील आरोपी संदर्भात एक अपडेट समोर आली आहे. या घटनेतील दुसरा आरोपी असलेला जीतू याचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केल्याचे समोर आले आहे.
मुलाच्या उपचारासाठी भाजपाच्या माजी खासदाराची याचना; डॉक्टरने हात लावला नाही, झाला मृत्यू
रात्री उशिरा झालेल्या चकमकीत जितेंद्र उर्फ जीतूचा मृत्यू झाला. मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानाहर ट्रॅकवर झालेल्या चकमकीत तो जखमी झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत एक पोलिसही जखमी झाला आहे. २७ ऑक्टोबर रोजी बीटेकची विद्यार्थिनी ऑटोने जात असताना आरोपींनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्याचा ऑटोमधून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या आरोपी विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. अहवालानुसार, २७ ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून आलेल्या बदमाशांनी ऑटोमध्ये बसलेल्या बीटेक विद्यार्थिनी कीर्ती सिंहचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्याचा विरोध केला. यानंतर चोरट्यांनी तिचा हात खेचून तिला ऑटोतून फेकून दिले, त्यानंतर तिला १५ मीटरपर्यंत रस्त्यावर ओढली.
जखमी झाल्यानंतर कीर्तीला गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. या विद्यार्थिनीला उपचारानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मसुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका गुन्हेगाराला अटक केली होती, तर आरोपी दुसरा फरार होता. हा फरार जीतू आता पोलिसांनी चकमकीत मारला आहे.