‘लिफ्ट मधून कुत्रा जाणार नाही’; निवृत्त IAS नं महिलेला लगावली थापड अन्..., हाणामारीचा VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 09:09 AM2023-10-31T09:09:17+5:302023-10-31T09:12:59+5:30
उत्तर प्रदेशातील नोडा येथे एका सोसायटीमध्ये पुन्हा एकदा लिफ्टमधून कुत्र्याला नेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वेळी, हा वाद ...
उत्तर प्रदेशातील नोडा येथे एका सोसायटीमध्ये पुन्हा एकदा लिफ्टमधून कुत्र्याला नेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वेळी, हा वाद एक रिटायर्ड आयएएस अधिकारी आणि एका दांपत्त्यात झाला आहे. या वादाचा आणि यावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या 49 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि रिटायर्ड आयएएस यांच्यात झालेली हाणामारी दिसत आहे.
याचवेळी संबंधित महिलेचा पतीही तेथे आला आणि रिटायर्ड आयएएस आरपी गुप्ता यांना मारहाण केली. ही घटना सेक्टर-108 मधील पार्क्स लॉरिएट सोसायटी (Parx Laureate Society) मध्ये घडली. मात्र, या घटनेनंतर, दोघांमध्येही समेट झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला लिफ्टमधून त्यांचा कुत्रा न्यायचा होता. मात्र याला रिटायर्ट आयएएस गुप्ता यांनी विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी गुप्ता यांनी त्यांचा मोबाईल काढताच तो महिलेने हिसकावून घेतला. यानंतर वाद आणखी वाढला आणि गुप्ता यांनी महिले थापड लगावली. यानंतर तेथे आलेल्या पतीसह महिलेने गुप्ता यांना मारहाण केली.
नोएडा में कोतवाली सेक्टर-39 क्षेत्र के सेक्टर-108 स्थित पार्क लारेट सोसाइटी में लिफ्ट में कुत्ते को ले जाने के विवाद में एक सेवानिवृत आईएएस और महिला के बीच विवाद हो गया। pic.twitter.com/rmWW1zYexQ
— Gautam Geetarjun (गीतार्जुन) (@GautamGeetarjun) October 30, 2023
घटनेची माहिती मिळताच कोतवाली सेक्टर-39 चे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, याप्रकरणी दोन्ही पक्षांपैकी कुणीही गुन्हा दाखल केलेला नाही.