प्रेमविवाह यशस्वी अन् ते निघाले अयोध्येला, कडाक्याच्या थंडीत जोडपे करणार ९०० किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 08:00 AM2024-01-18T08:00:47+5:302024-01-18T08:02:21+5:30
अनेक जण अयोध्येकडे मार्गस्थ झाले आहेत.
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे देशभरातील रामभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक जण अयोध्येकडे मार्गस्थ झाले आहेत.
कडाक्याच्या थंडीत एक नवविवाहित जोडपेही पायीच अयोध्येला निघाले आहे. हे दोघेही ९०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ते बिहारमधील कटिहार येथून पायी निघाले आहेत. ते सध्या उत्तर प्रदेशातील बलिया येथे पोहोचले आहेत. रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होत आहे.
अयोध्येला जाणाऱ्या रोशन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह यशस्वी झाल्यास रामाच्या दर्शनासाठी पायी जाईन असे म्हटले होते. नुकतीच त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत आता तो पत्नी रोशनीसह अयोध्येला निघाला आहे.
अन् घरच्यांनी दिला सहजपणे होकार
रोशनी कुमारी म्हणते की, आमचे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये बदलल्याबद्दल देवाचे आभार.
घरच्यांनी अगदी सहज होकार दिला. त्यामुळे आम्ही दोघे अयोध्येला जात आहोत.
भगवान रामाकडे माझी एकच इच्छा आहे की, आमचे कुटुंब सुखी ठेव. देशवासीयांनाही सुखात ठेव. २२ जानेवारीनंतर जेव्हाही संधी मिळेल तेव्हा दर्शन घेऊ, असे रोशनीने म्हटले आहे.