"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 20:35 IST2024-08-02T20:35:24+5:302024-08-02T20:35:43+5:30
Keshav Prasad Maurya News: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो.

"...तर मी उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो नसतो, केशव प्रसाद मौर्य यांचं मोठं विधान
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना ही सरकारपेक्षा मोठी असल्याचं विधान केलं आहे. केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, जर मी संघटनेमध्ये नसतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो नसतो. संघटनाच निवडणूक लढते आणि संघटनेमधूनच लोक सरकारमध्ये जातात. मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी सुरू आहेत. तसेच त्यामधून सरकार मोठं की पक्ष संघटना हा वाद पुढे आला आहे.
दरम्यान, केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशात सध्या गाजत असलेल्या नजूल विधेयकाबाबत सांगितलं की, हे विधेयक समितीकडे पाठण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या त्याबाबत काही बोलणं योग्य ठरणार नाही. मला तुमच्या भावना समजल्या आहेत. याबाबत काही मार्ग निघतो का हे पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच जो निर्णय असेल तो राज्य सरकारला सांगितलं जाईल.
यावेळी केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, समाजवादी पक्ष आता समाप्तवादी पक्ष बनणार आहे. खोटं बोलून काही जागा त्यांनी जिंकल्या. ते केवळ अपप्रचार करतात. त्यांच्याकडे कुठलंही काम नाही आहे. ते सत्तेत येण्याची २०२७ मध्येही काही शक्यता नाही आणि २०३७ मध्येही काही शक्यता दिसत नाही. समाजवादी पक्ष पीडीएच्या नावाने ब्राह्मणांची दिशाभूल करत आहे. त्यांचं नातं हे गुंड आणि माफियांशी आहे. त्यांनी एकदा दिशाभूल करून जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र असं पुन्हा पुन्हा घडणार नाही. .येणाऱ्या दिवसांमध्ये जनता त्यांना धडा शिकवेल.